Horoscope Today 20 November 2024 : आज 20 नोव्हेंबरचा म्हणजेच आज बुधवारचा दिवस आहे. तसेच, आजचा वार आपल्या लाडक्या बाप्पाचा आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आज मतदानाचा देखील दिवस आहे त्यामुळे आजच्या दिवसाला विशेष महत्त्व आहे.पण आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रभावशाली असणार आहे. आज मतदानाचा दिवस असल्या कारणाने तुमचा दिवस व्यस्ततेचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामावर पूर्ण लक्ष द्याल. तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. आज कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. धार्मिक कार्यात मन रमाल.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. तुमच्या दिवसाची सुरुवात कमकुवत असणार आहे. आज धनप्राप्तीचे चांगले योग आहेत. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामासंदर्भात तुमच्या बॉसकडे बातचीत करावी. तसेच, कोणतीही समस्या असल्यास तुमच्या कुटुंबियांबरोबर चर्चा करावी.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही कोणताही निर्णय घेताना घाई-गडबडीत घेऊ नये. तसेच, व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. तुमच्या घरात शुभ आणि मंगलमय कार्यक्रमाचं आयोजन केलं जाऊ शकतं. यात तुम्ही आनंदाने सहभागी व्हाल.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याबरोबर तुमचे मतभेद असतील तर ते वेळीच दूर करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा नंतर समस्या वाढू शकतात. तसेच, मनाच्या शांतीसाठी धार्मिक गाणी, भजन, किर्तन ऐका.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्ही भविष्यासाठी काहीतरी नवीन निर्णय घेऊ शकतात. फक्त तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. सामाजिक कार्यात तुम्ही जास्त सहभागी व्हाल. नोकरी कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्हाला धनप्राप्तीचे अनेक संकेत मिळतील. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, आज तुम्ही तुमच्या भविष्याप्रती सकारात्मक असाल. कुटुंबात तुमचं वागणं सगळ्यांना पटेल. प्रगतीचे अनेक मार्ग तुमच्यासमोर खुले होतील.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मान-सन्मान वाढवणारा आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा तुम्ही तुमच्या जोडीदारासमोर व्यक्त करू शकता. आई तुमच्यावर काहीतरी कारणावरुन रागावेल. असं घडल्यास, तिला चांगल्या शब्दात पटवून देण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला इतर कोणत्याही नोकरीची ऑफर मिळाल्यास, तुम्ही ती स्वीकारू शकता. कौटुंबिक सदस्याच्या लग्नात येणाऱ्या अडचणींबद्दल तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलाल.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीचे लोक आज व्यर्थ धावपळ करण्यात व्यस्त राहतील. आज तुमचा खर्चही वाढेल. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. तुम्हाला कोणत्याही व्यवहाराशी संबंधित बाबींवर पूर्ण लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या वडिलांबद्दल काही वाईट वाटेल. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपासून तुम्हाला अंतर राखावं लागेल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नवीन प्रकल्पावर काम करण्यासाठी चांगला असेल. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या खर्चाचं नियोजन बनवावं लागेल, अन्यथा तुम्हाला नंतर पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही कोणालाही व्यवसायात भागीदार बनवू नका, अन्यथा तो तुमची फसवणूक करू शकतो.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी असणार आहे. तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये परस्पर प्रेम असेल. नोकरीत काम करणाऱ्यांना काही अडचणी येत असतील तर त्या दूर होतील. आज तुम्हाला कोणतीही जोखीम घेणं टाळावं लागेल. कुटुंबातील लोकांशी तुमची चांगली मैत्री होईल. तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी कोणतीही परीक्षा दिली असेल तर त्याचा निकाल चांगलाच येईल.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फलदायी असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याकडे पूर्ण लक्ष देणं आवश्यक आहे. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या मनमानी वागणुकीमुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या दीर्घकालीन व्यावसायिक योजनांना गती मिळेल. कोणत्याही वादापासून दूर राहा. अचानक आर्थिक लाभ झाल्यामुळे तुमच्या आनंदाला सीमा उरणार नाही. तुमच्या भूतकाळातील काही चुकांमधून तुम्हाला धडा घ्यावा लागेल.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायाबाबत अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. कौटुंबिक कलह वाढल्याने तुमचं मन अस्वस्थ राहील. दोन्ही बाजू ऐकून घेऊनच निर्णय घेतला तर बरं होईल. आज तुमच्यावर खूप कामाचा ताण असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. नोकरीशी संबंधित बाबींवर थोडं लक्ष द्यावं लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :