Horoscope Today 20 June 2024 : पंचांगानुसार, आज 20 जून 2024, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


व्यवसायिक इतरांशी स्पर्धा करण्याचं आव्हान पेलतील आणि इतरांच्या कौतुकास पात्र ठरतील.


वृषभ (Taurus Horoscope Today)


एखादी गोष्ट हक्काने जवळच्या व्यक्तींकडून करून घ्याल, ज्यामध्ये त्या व्यक्तीलाही आनंद मिळून जाईल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज एखाद्या चांगल्या गोष्टीची नांदी कराल. भावंडांबरोबर मतभेद झाले तरी त्याची कारणं न समजल्यामुळे थोडेसे गोंधळून जाल.


कर्क (Cancer Horoscope Today)


आज खूप काही गोष्टी करण्याचा मूड असेल, त्यामुळे अडलेली कामं उत्साहाने मार्गी लावाल. 


सिंह (Leo Horoscope Today)


आर्थिक स्थिती सुधारेल. महिलांनी थोडा तापटपणा ताब्यात ठेवावा. 


कन्या (Virgo Horoscope Today)


मुलांकडून एखादी चांगली बातमी समजेल. संतती सौख्य मिळेल, त्यांच्यासाठी जरा जास्त वेळही काढाल.


तूळ (Libra Horoscope Today)


कुठे काय बोलावं याचा धरबंद ठेवावा लागेल. एखाद्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत तुम्हाला सामावून न घेतल्यामुळे मनातून जरा खट्टू व्हाल. 


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


आज प्रत्येक गोष्टीचा अंतर्मुख होऊन विचार कराल. मित्र-मैत्रिणीच्या सहवासात रमून जाल.


धनु (Sagittarius Horoscope Today)


मैत्रीचा अमोल ठेवा आनंदाचं लेणं घेऊन येईल आणि तेथे मन रमून जाईल. महिलांना घरामध्ये जास्त लक्ष द्यावं लागेल.


मकर (Capricorn Horoscope Today)


व्यवसायात भीक नको, पण कुत्रा आवर म्हणायची वेळ येईल. त्यासाठी इतर पर्यायांकडेही लक्ष द्यावं लागेल.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


आज धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी अवस्था होऊन जाईल, यासाठी सर्वाचा समतोल राखावा लागेल. 


मीन (Pisces Horoscope Today)


अनावश्यक गोष्टीमध्ये अडेल तट्टूपणा केला नाही तर फायद्याचे ठरेल. महिलांच्या अंगातील कलागुणांना वाव मिळेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणाच्याही बोलण्यात पटकन फसतात, यांचा लोक नेहमीच घेतात गैरफायदा