Continues below advertisement

Atal Pension Yojana : प्रायव्हेट नोकरी (Private Job) करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक मोठा प्रश्न कायम असतो आणि तो म्हणजे रिटायरमेंटनंतर घरखर्च कसा चालणार? नोकरीच्या काळात दरमहा पगार येतो, पण वय वाढत तस खर्च काही कमी होत नाही. वैद्यकीय गरजा, घरखर्च आणि दैनंदिन आवश्यतांचा भार कायम राहतो. अशा परिस्थितीत जर दरमहा एक निश्चित पेन्शन (Monthly Pension) मिळाली, तर आयुष्य अधिक सुरक्षित आणि सुसह्य होतं.

प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांची ही गरज ओळखून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Yojana APY) सुरू केली. ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, ज्यांना रिटायरमेंटनंतर कोणतीही पेन्शन किंवा आर्थिक आधार मिळणार नाही.

Continues below advertisement

अटल पेन्शन योजना म्हणजे काय? (What is Atal Pension Yojana)

अटल पेन्शन योजना (APY) वर्ष 2015 मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या आणि असंघटित क्षेत्रातील लोकांना वृद्धापकाळात आर्थिक सुरक्षितता (Financial Security after Retirement) देणे हा आहे.

या योजनेत 18 ते 40 वर्षे वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. सदस्याला आपल्या वयानुसार आणि निवडलेल्या पेन्शन स्लॅबनुसार दरमहा ठराविक रक्कम जमा करावी लागते. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 1,000 ते 5,000 रुपये पेन्शन मिळते.

आजीवन पेन्शनची हमी (Lifetime Pension Benefit)

या योजनेतील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ही पेन्शन आयुष्यभर मिळते. सदस्याच्या निधनानंतर ही पेन्शन पती किंवा पत्नीस मिळते. दोघांचाही मृत्यू झाल्यास जमा केलेली रक्कम नॉमिनीला दिली जाते. सध्या कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ नसलेल्या लोकांसाठी ही योजना भविष्यासाठी एक मजबूत आधार ठरते.

अर्ज कसा करायचा? (How to Apply for APY)

अटल पेन्शन योजनेत अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

अर्जदाराकडे बँक खाते असणे आवश्यक आहे.

जवळच्या बँक शाखेत जाऊन APY फॉर्म भरावा लागतो.

आधार कार्ड आणि मोबाइल नंबरद्वारे पडताळणी होते.

त्यानंतर दरमहा ECS द्वारे ऑटोमॅटिक योगदान बँक खात्यातून वजा केले जाते.

पेन्शन स्लॅब निवडल्यानंतर तुमचा मासिक प्रीमियम निश्चित होतो.

लवकर सुरुवात, जास्त फायदा (Early Investment Benefits)

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती 20 व्या वर्षी जर 1,000 रुपयांची मासिक पेन्शन निवडते, तर तिला दरमहा केवळ सुमारे 42 रुपये भरावे लागतात. 5,000 रुपयांच्या पेन्शनसाठी योगदान जास्त असते, पण वय कमी असेल तर गुंतवणूक कमी आणि फायदा अधिक मिळतो.

प्रायव्हेट नोकरदारांसाठी सुरक्षित भविष्याचा मार्ग

आजच्या अनिश्चित काळात, जिथे प्रायव्हेट नोकरीत रिटायरमेंटची कोणतीही हमी नसते, तिथे अटल पेन्शन योजना ही भविष्य सुरक्षित करणारी सरकारी योजना ठरतेय. थोडीशी बचत आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला वृद्धापकाळात आत्मसन्मानाने जगण्याची ताकद देऊ शकतो.