Horoscope Today 19 January 2025 : आज 19 जानेवारीचा दिवस म्हणजेच रविवारचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Today Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चावर लक्ष द्यावे. विनाकारण पैसे खर्च करु नका. भविष्यात ते कामी येऊ शकतात. तसेच, तुमच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच तुम्ही कुटुंबियांकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, जर तुम्हाला जुन्या नोकरीतून सुटका हवी असल्यास नवीन नोकरीचा शोध घेण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामासाठी इतरांवर अवलंबून राहू नका.
वृषभ रास (Taurus Today Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ऊर्जेचा असणार आहे. आज जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तर, इतरांशी संवाद साधताना बोलण्यात नम्रपणा हवा. आरोग्याच्या बाबतीत काळजी घ्या.
मिथुन रास (Gemini Today Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समस्यांनी भरलेला असणा आहे. सकाळपासूनच तुमच्यासमोर अनेक नवी आव्हानं उभी असतील. त्यांना पार कसं करायचं ते ठरवा. तसेच, निराश न होता परिस्थितीशी दोन हात करुन सामना करा. विद्यार्थ्यांमधील कलाकौशल्यांना आज चांगला वाव मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल.
कर्क रास (Cancer Today Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे.तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. या पाहुण्यांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते. तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असल्या कारणाने तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
सिंह रास (Leo Today Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे.जुन्या कोर्ट कचेरीच्या संदर्भात तुम्हाला अधिक लक्ष घ्यावं लागेल. आज रविवार असल्या कारणाने तुमच्या घरी संध्याकाळी पाहुणे येतील. किंवा तु्म्ही मित्र-मैत्रींणींबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. आज विनाकारण कोणालाही पैसे देऊ नका. ते तुम्हाला परत मिळणार नाहीत. आरोग्याची काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Today Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला थोडा अशक्तपणा जाणवेल. अशा वेळी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमच्या बोलण्यामुळे इतर दुखवू शकता. संध्याकाळचा वेळ धार्मिक कार्यात घालवा. तुम्हाला प्रसन्न वाटेल. तसेच, लहान मुलांबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मनात विचारांचा गोंधळ सुरु असेल तो थांबेल.
तूळ रास (Libra Today Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. आज जर तुम्हाला एखादी नवीन प्रॉपर्टी किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे. तसेच, जर तुम्हाला नोकरीत बदल करायचा असेल तर ही तुमच्यासाठी चांगली वेळ असेल. तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील.
वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, तुमचे जुने रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. नवीन काम करण्याची तुमची इच्छा जागृत होईल. जर तुमच्या पार्टनरबरोबर मतभेद असतील तर ते आज मिटवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या व्यवसायाचा मोठा विस्तार होईल.
धनु रास (Sagittarius Today Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात तुम्ही चांगले सक्रिय असाल. तुम्हाला काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, पैसे गुंतवणुकीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आरोग्याच्या बाबतीत सतर्क असणं गरजेचं आहे.
मकर रास (Capricorn Today Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगला लाभ मिळेल. तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल. तसेच, जर तुम्हाला वाहन चालवायचं असेल तर वाहन जपून चालवण्याची गरज आहे. तसेच, नवीन प्रॉपर्टी खरेदी करु शकता. पार्टनरशिपमध्ये काम केल्याने तुमचं थोड्या प्रमाणात नुकसानही होण्याची शक्यता आहे.
कुंभ रास (Aquarius Today Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे. वातावरणातील बदलांमुळे तुमच्या तब्येतीत चढ-उतार जाणवू शकतात. तसेच, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
मीन रास (Pisces Today Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुम्ही आज एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकतात. तसेच, काही खास व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. राजकारणात तुम्ही सक्रिय असाल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. याचा तुम्ही वेळीच लाभ घेणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: