Horoscope Today 18 June 2024 : पंचांगानुसार, आज 18 जून 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


कामानिमित्ताने परदेश प्रवासाच्या संधी उपलब्ध होतील. एखादी आर्थिक गुंतवणूक चांगली होऊ शकते.


वृषभ (Taurus Horoscope Today)


तुम्ही केलेल्या महत्त्वाच्या कामाची नोंद वरिष्ठांनी घ्यावी, त्यासाठी जादा कष्टाची संपर्काची तयारी ठेवावी लागेल. 


मिथुन (Gemini Horoscope Today)


आज काही बाबतीत दृढनिश्चयी राहाल. तुमची मते इतरांनी किती प्रयत्न केले तरी बदलणे अशक्य ठरते.


कर्क (Cancer Horoscope Today)


ज्या गोष्टी गुप्त ठेवायला हव्यात त्या काही कारणामुळे तुम्हाला दुसऱ्यांना सांगावे लागतील. महिला घरातील वातावरणात रमून जातील.


सिंह (Leo Horoscope Today)


जोडीदाराशी थोडक्या कारणावरून खटकेल. धंद्यामध्ये भागीदारांच्या मतांना किंमत द्यावी लागेल.


कन्या (Virgo Horoscope Today)


तुमच्यातील कला जोपासाल परंतु कष्टामध्ये थोडे कमी पडण्याची शक्यता आहे.


तूळ (Libra Horoscope Today)


आज थोडा स्वस्थपणा जाणवेल. ज्या चुका होतील त्या दुरुस्त करण्यात वेळ जाईल.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


समजुतीचे धोरण स्वीकारावे लागेल. महिलांनी कामाची योग्य करावी. 


धनु (Sagittarius Horoscope Today)


आज थोडी स्वप्नाळू वृत्ती राहील त्यामुळे दुसऱ्यावर चटकन विसरून राहू शकता त्याचा गैरफायदा  घेतला जाण्याची शक्यता आहे.


मकर (Capricorn Horoscope Today)


सरकारी नोकरीत असणाऱ्यांना प्रमोशनच्या संधी येऊ शकतात. थोडे अस्थिर आणि चंचल बनाल. 


कुंभ (Aquarius Horoscope Today)


प्रकृतीची काळजी घ्यावी. ज्यांना श्वास घ्यायला त्रास होतो फुफुसाचे विकार आहेत त्यांनी वेळेवर औषधोपचार घ्यावा.


मीन (Pisces Horoscope Today)


आर्थिक स्थिती सुधारण्याच्या मार्गावर राहील. नोकरीच्या ठिकाणी चांगले वातावरण लाभल्यामुळे काम करायला आनंद वाटेल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; अनपेक्षित धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार