Horoscope Today 17 March 2025 : पंचांगानुसार, आज 17 मार्च 2025, म्हणजेच आजचा वार सोमवार. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
आज कोणतेही निर्णय लांबणीवर टाकू नयेत काही नवीन गोष्टी करण्याचा विचार कराल.
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
स्वतःबद्दलच्या अवाजवी मोठ्या कल्पनांना थारा देऊ नका.
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
स्वतंत्र वृत्तीमुळे विचाराने कोणतेही निर्णय घेऊ नये. महिलांना घरातील लोकांना समजून घ्यावे लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कोणत्याही आर्थिक किंवा गुंतागुंतीचे निर्णय तर का फडके न घेण्यातच तुमचा फायदा आहे.
सिंह रास (Leo Horoscope Today)
कष्ट करण्याच्या तुमच्या तयारीचा तुम्हाला फायदा होणार आहे.
कन्या रास (Virgo Horoscope Today)
तुमची हुशारी आणि समय सूचकतेमुळे नोकरीध्यात रेंगाळलेल्या कामांना चालना मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये यश मिळेल ज्यांच्या अंगी उपजत कला आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
काहीतरी नवीन करण्याची योजना अमलात आणल वैवाहिक सौख्यामध्ये विश्वासाचा गोफ गुंफला जाईल.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
आज कोणतेही काम करताना मानसिक समाधान मिळेल स्थावर इस्टेटि संबंधी महत्त्वाचे निर्णय घ्यावेत.
मकर रास (Capricorn Horoscope Today)
कुठे एखादी गुंतवणूक करायची असेल तर ग्रहांची साथ चांगली मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
आर्थिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पावले उचला अध्यात्मिक उन्नती होईल.
मीन रास (Pisces Horoscope Today)
विद्यार्थ्यांनी आपली प्रगती साधण्यासाठी कष्टाला पर्याय नाही ही गोष्ट लक्षात ठेवावी.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: