Horoscope Today 17 January 2025 : पंचांगानुसार, आज 17 जानेवारी 2025, शुक्रवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
व्यवसायात डोळसपणे धोका पत्करावा लागेल. महिलांच्या अपेक्षा पुऱ्या होऊ शकणार नाहीत.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज सहजासहजी कोणाच्या आहारी जाणार नाही. आपल्या ध्येयाशी प्रामाणिक राहाल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
साहित्य संशोधक व नाविन्यपूर्ण गोष्टी करणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळ्या संधी मिळतील.
कर्क (Cancer Horoscope Today)
थोडासा अहंकार आणि स्वतःबद्दलच्या अवाजवी कल्पनांना थारा देऊ नका.
सिंह (Leo Horoscope Today)
तुमच्या लहरी स्वभावामुळे कोणाशी फार काळ टिकून राहणे कठीण होईल.
कन्या (Virgo Horoscope Today)
दुसऱ्यावर टीका करताना ती तुमच्यावरही उलटू शकते याची जाणीव ठेवा.
तूळ (Libra Horoscope Today)
आज कोणत्याही मायाजाळात अडकू नका. अत्यंत स्वतंत्र वृत्ती आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
महिला इतरांच्या मताची परवा करणार नाहीत, परंतु तुमच्या रसिक वृत्तीचे दर्शन लोकांना घडेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
सतत कार्यरत राहणे आज तुम्हाला आवडणार आहे, कोणतेही काम मनापासून कराल.
मकर (Capricorn Horoscope Today)
हाती घेतले ते तडीस न्याल. समूहामध्ये राहून आपली आणि दुसऱ्यांचीही कर्मणूक कराल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
तरुणांना प्रेम प्रकरणांमध्ये पुढे जाता येईल. कोणाच्याही विरोधाला न जुमानता स्वतंत्र वृत्तीने काम कराल.
मीन (Pisces Horoscope Today)
आवश्यक तेथे लोकांच्या संपर्कात याल. विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: