Horoscope Today 16 January 2025 : पंचांगानुसार, आज 16 जानेवारी 2025, गुरुवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज जरा मोजकेच बोलणे पसंत कराल. इतरांशी चार हात लांब राहाल. स्वत:च्या बुद्धीचं प्रदर्शन करणं टाळा. 


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


स्वभाव मनमोकळा असला तरी अति बोलणे टाळा. कामासाठी लोकांचा उपयोग करून घ्याल. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


एखाद्या कामाचे संशोधन करीत असाल तर त्यामध्ये प्रगती होईल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


नवीन घराच्या खरेदीचे बेत थोडे पुढे ढकलावे लागतील ज्येष्ठांना निद्रानाशाचा विकार त्रास देईल.


सिंह रास (Leo Horoscope Today)


वारसा हक्काने मिळणाऱ्या प्रॉपर्टीबाबत तुम्ही सकारात्मक राहाल. नवीन नोकरी- व्यवसायात प्रगतीच्या संधी आहेत.


कन्या रास (Virgo Horoscope Today)


तुमच्या मनाला सतत सुधारणा करण्याचे वेड लागेल नव्या वाटा साद घालतील. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


योग्य व्यक्तींशी संपर्कात राहावे यावरच तुमच्या कार्याचा दर्जा आणि उंची ठरेल. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


आज तुमचे स्वतंत्र विचार राहतील. अति बोलण्याचा मोह तुम्हाला आज होणार नाही.  


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जास्त पैसा गुंतवावा लागेल बुद्धीच्या जोरावर कर्तृत्व दाखवा. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


मुलांसाठी आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


पैसा मिळेल पण तो जास्त खर्च होण्याकडेच कल राहील. यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतील.  


मीन रास (Pisces Horoscope Today)


एखाद्या बदलाला तुम्ही किती परिणामकारकपणे सामोरे जाता यावर तुमच्या यशाचा स्तर अवलंबून राहील.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117    


हे ही वाचा :


Numerology Of Mulank 1 : राजेशाही थाटात जगतात 'या' जन्मतारखेचे लोक; शक्ती, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर जिंकतात इतरांची मनं