Continues below advertisement

पुणे : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे (Indurikar Maharaj) पुण्यात सुरू असलेले कीर्तन काही वेळेसाठी बंद करण्यात आल्याची घटना घडली. हांडेवाडी परिसरात सुरू असलेले कीर्तन पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर थांबवण्यात आलं. रस्त्यावर सुरू असलेल्या कीर्तनामुळे वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी ही भूमिका घेतली. नंतर जमलेले लोक एका बाजूला बसले आणि दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू झाली. त्यानंतर इंदुरीकर महाराजांचे कीर्तन पुन्हा सुरू झाले. ही घटना शुक्रवार रात्रीची असल्याचं सांगण्यात येत आहे.

पुण्यातील हांडेवाडी परिसरात निवृत्ती महाराजांचे कीर्तन सुरू होतं. हे कीर्तन ऐकण्यासाठी लोक रस्त्यावर बसले होते. मात्र त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमामुळे हडपसरपर्यंत गाड्यांची रांग लागली. त्यामुळे एक पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आला आणि त्याने महाराजांना कीर्तन बंद करण्यास सांगितलं.

Continues below advertisement

रस्त्यावर सुरू असलेल्या या कार्यक्रमामुळे हडपसरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्याने महाराजांना कीर्तन बंद करण्यास सांगितलं. विना परवाना रस्त्यावर कीर्तनाला परवानगी नसल्याचंही पोलीस अधिकारी म्हणताना दिसत आहे.

Indurikar Maharaj Handewadi Kirtan : एका बाजूने रस्ता सुरू

पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेनंतर त्या ठिकाणी स्वयंसेवक जमले आणि त्यांनी त्या अधिकाऱ्याला विनंती केली. आम्ही एका बाजूने रस्ता सुरू करतो असं त्यांनी विनंती केली. त्यानंतर त्या पोलीस अधिकाऱ्याने माईकवरुन जमलेल्या लोकांनी रस्त्याच्या एका बाजूला बसण्याची विनंती केली. आपणही इंदुरीकर महाराजांचे कार्यक्रम ऐकले आहेत, एका कार्यक्रमाला तर महाराजांच्या बाजूला बसून जेवणही केल्याचं त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. 

या कार्यक्रमासाठी लोकांची खुर्च्यांवर बसण्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळतात लोकांनी आपापल्या खुर्च्या एका बाजूला घेतल्या. तसेच काही लोक हे इंदुरीकर महाराजांच्या स्टेजच्या समोर रिकाम्या जागेत बसल्याचं दिसून आलं.

पोलिसांच्या विनंतीनंतर आणि लोकांच्या सहकार्याने एका बाजूने वाहतूक सुरू झाली. त्यामुळे कीर्तनाचा पुढचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला. त्याचवेळी एका बाजूने वाहतूकही सुरू झाली. या संबंधित व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ही बातमी वाचा: