Horoscope Today 13 August 2024 : पंचांगानुसार, आज 13 ऑगस्ट 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. आज श्रावणातील दुसरा मंगळवार असून या दिवशी मंगळागौर साजरी केली जाते. तसेच ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष (Aries Horoscope Today)


रोजच्या कलकलाटातून शांतीचा अनुभव घ्याल. सामाजिक काम करणाऱ्यांना भरपूर सहकार्य मिळेल.


वृषभ (Taurus Horoscope Today)


आज हातून काम चांगले होईल. तुमच्या बुद्धीचा योग्य उपयोग करून घ्याल.


मिथुन (Gemini Horoscope Today)


पैसा मिळाला तरी खर्चाला मर्यादा राहणार नाही, त्यामुळे आवश्यक गोष्टींची यादी करून खर्च करा.


कर्क (Cancer Horoscope Today)


छोटे मोठे प्रवासाचे योग येतील. कुटुंबाने मित्रांसमवेत सहलीला जाण्याचे बेत ठरवाल.


सिंह (Leo Horoscope Today)


अचानक एखादे जुने येणे वसूल होण्याची शक्यता. महिला शांती आणि समाधानाचा आस्वाद घेतील.


कन्या (Virgo Horoscope Today)


प्रतिकूल परिस्थितीमध्येही काम चालू ठेवणार आहात. एखाद्या दुर्मिळ संधीबद्दल उगीचच निरीच्छपणा दाखवाल.


तूळ (Libra Horoscope Today)


रसिक असूनही अरसिकतेचा बुरखा पांघरून ताण वाढवायचे कारण नाही. कोणताही ताण न ठेवता आनंदी राहा.


वृश्चिक (Scorpio Horoscope Today)


कोणत्याही अडचणीतून सुटका करून घेण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब करू शकता.


धनु (Sagittarius Horoscope Today)


परिस्थितीचा योग्य आढावा घेऊन त्याप्रमाणे वागणूक ठेवावी.


मकर (Capricorn Horoscope Today)


नोकरीमध्ये अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह होईल, तेव्हा सांभाळा.


कुंभ (Aquarius Horoscope Today)


मुलांना चार उपदेशाचे शब्द सांगावेसे वाटतील, परंतु त्यामुळे निराशा पदरात पडण्याची शक्यता आहे.


मीन (Pisces Horoscope Today)


समस्यांचा योग्य क्रम लावल्यास त्यावर मात करता येईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117         


हेही वाचा: 


Weekly Lucky Zodiacs : येणारे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार चमत्कारी; उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले, अपार धनलाभाचे संकेत