Horoscope Today 12 October 2024 : पंचांगानुसार, आज 12 ऑक्टोबर 2024, शनिवारचा दिवस आहे. तसेच, आज देशभरात दसरा आणि विजयादशमीचा उत्सव साजरा केला जातोय. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. तसेच, आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मेष रास (Aries Horoscope Today)


आज आत्ता जे घडत आहे त्याच्यावर जास्त विश्वास ठेवाल आणि कामाला लागाल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


आज मागे होऊन गेलेल्या गोष्टी उगाळत बसू नका त्यांनी काही साध्य होणार नाही. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


आज तुमचे विचार जगाच्या ही पुढे धावतील महिलांना वैवाहिक जीवनात संसारिक कटकटीला सामोरे जावे लागेल. 


कर्क रास (Cancer Horoscope Today)


मॅनेजमेंट शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाचा आनंद घेता येईल. जुनी येणी वसूल होतील. 


सिंह रास (Leo Horoscope Today)


मागचा अनुभव गाठीस धरून पुढील वाटचाल कराल. घरातील मोठ्यांचे आरोग्य सांभाळा. 


कन्या रास (Virgo Horoscope Today)


व्यवसाय मध्ये नशिबाची साथ कमी मिळाली तरी चिकाटीचा अवलंब करून काम पूर्ण कराल. 


तूळ रास (Libra Horoscope Today)


तुमच्या आमच्या गुणांची कदर केली जाणार नाही त्यामुळे निराशा येऊ शकते. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)


आजूबाजूचे वातावरण पूरक नसल्यामुळे काम करण्याचा उत्साह येणार नाही. 


धनु रास (Sagittarius Horoscope Today)


कुटुंबातील दोन पिढ्यातील अंतर जाणवल्याशिवाय राहणार नाही वैचारिक मतभेद राहतील. 


मकर रास (Capricorn Horoscope Today)


आज तुमच्या भावनांवर तुमचे नियंत्रण असेल याचा अनुभव जवळच्या लोकांना येईल. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


व्यवसाय नोकरीमध्ये नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवाल. 


मीन रास (Pisces Horoscope Today)


तुम्ही केलेल्या धाडसी कल्पनांचे चांगले वाईट प्रतिसाद मिळतील परंतु त्याचे स्वागतच होईल.


डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)


संपर्क - 9823322117                                         


हेही वाचा:


Dussehra 2024 : दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा; सणाचा आनंद द्विगुणित करा