Angarak Yog 2025: ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), सध्या मागील काही दिवसांत मोठ्या ग्रहांच्या काही महत्त्वपूर्ण हालचाली होताना दिसत आहेत, ज्यामुळे शुभ किंवा अशुभ योग निर्माण होतायत. नुकताच मंगळ (Mangal) आणि राहू (Rahu) ग्रहांनी मिळून अंगारक योग (Angarak Yog 2025) बनवला आहे. या अंगारक योगाच्या निर्मितीचा काही राशींच्या लोकांवर अशुभ परिणाम होईल. तसेच यामुळे पुढच्या काही दिवसात काही अशुभ घटना घडण्याचे संकेत मिळत आहेत. कोणत्या राशींना सावधान राहण्याचे संकेत मिळत आहेत, जाणून घेऊया..
ज्योतिषशास्त्रात अंगारक योग अशुभ मानला जातो, 7 डिसेंबरपर्यंत सावधान (Angarak Yog 2025)
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रहाने 27 ऑक्टोबर रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. मंगळ राहूवर दृष्टी टाकत आहे. यामुळे अंगारक योग निर्माण झाला आहे. मंगळ आणि राहू यांनी हा योग बनवला आहे, जो अनेक राशींसाठी अशुभ असेल. हा योग तीन राशींच्या लोकांवर परिणाम करेल. ज्योतिषशास्त्रात अंगारक योग अशुभ मानला जातो. 3 राशींना प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागेल. हा अंगारक योग 7 डिसेंबरपर्यंत सक्रिय असेल. तोपर्यंत तीन राशींना सावधगिरी बाळगावी लागेल. जाणून घेऊया कोणाला सावध राहावे लागेल.
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि राहू यांच्या अंगारक योगामुळे कर्क राशीच्या लोकांना अशुभ परिणामांना सामोरे जावे लागेल. तुमचे बोलणे तुमच्या कामात अडथळा आणू शकते, म्हणून तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही प्रकारचा वाद टाळा. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. काळजीपूर्वक विचार करून प्रत्येक पाऊल उचला.
मकर (Capricorn)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी काळ कठीण राहणार आहे. रागामुळे तुमचे बोलणे कठोर होऊ शकते, ज्यामुळे नुकसान होऊ शकते. संयम बाळगा आणि घाईघाईने घेतलेले निर्णय टाळा. तुमचा अपघात होऊ शकतो आणि दुखापत होऊ शकते. स्वतःची काळजी घ्या.
कुंभ (Aquarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी अंगारक योग चांगला राहणार नाही. यामुळे समस्या, करिअरमधील आव्हाने आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुमचे खर्च कमी करा आणि सावधगिरी बाळगा.
हेही वाचा
Mangal Shani Yuti: फक्त 3 दिवस बाकी, 5 राशींचं भाग्य उजळणार! 14 नोव्हेंबरला मंगळ-शनिची युती श्रीमंतीचे योग बनवणार, पैसा दुप्पट, उत्पन्न वाढणार
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)