Horoscope Today 11 January 2025 : पंचांगानुसार, आज 11 जानेवारी 2025, शनिवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
आज मागच्या आठवणींमध्ये रमून जाल. विद्यार्थी वर्ग थोडा आळशी बनेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
नवीन काही शिकण्याची उर्मी ठेवणार आहात. महिला शांत वृत्ती जोपासतील.
मिथुन (Gemini Horoscope Today)
अभ्यासाबाबत थोडा विसरभोळेपणा अनुभवाल. थोडी ध्यानधारणा करावी.
कर्क (Cancer Horoscope Today)
महिला शांत वृत्तीने काम करतील. कल्पनाशक्ती वाढेल.
सिंह (Leo Horoscope Today)
मैत्रीमध्ये थोडे वादविवाद होण्याची शक्यता आहे. महिला छंद जोपासतील.
कन्या (Virgo Horoscope Today)
काम धंद्यामध्ये चांगले सहकारी मिळतील. स्वतंत्र वृत्ती राहील.
तूळ (Libra Horoscope Today)
आत्मविश्वासाने स्वकर्तृत्वावर पुढे याल, त्यामुळे कोणाची मदत घ्यायला आवडणार नाही.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
स्वतःच्या बुद्धीने, तर्काने काही कामे अशी निपटाल की त्यामुळे घरात तुम्हाला मान मिळेल.
धनु (Sagittarius Horoscope Today)
व्यवहारात थोडी तारतम्य बुद्धी आणि सारासार विचार वापरलात तर कामात यश मिळेल.
मकर (Capricorn Horoscope Today)
तुमच्या दृढनिश्चयामुळे मी म्हणणारे तुमच्यापुढे नांगी टाकतील.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
थोडी मानसिक ताण आज अनुभवास येतील. चारचौघातले वर्तन विनम्र राहील.
मीन (Pisces Horoscope Today)
प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात याल. घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: