Horoscope Today 1 March 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 1 मार्च 2024, शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? तूळ, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? तूळ, वृश्चिक, धनु राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या....


तूळ (Libra Today Horoscope) 


नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला नोकरीत काम करण्याचा कंटाळा येऊ शकतो. तुमचं रोजचं काम सोडून तुम्हाला इतर काम करण्याची आवड निर्माण होऊ शकते. तुम्ही नोकरी सोडण्याचा विचारही करू शकता, पण एखादं काम सुरू केल्यानंतरच तुम्ही नोकरी सोडावी, अन्यथा अडचणीत अडकू शकता.


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज व्यावसायिकांनी आपल्या कामावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपल्या विरोधकांच्या हालचालींवर देखील लक्ष ठेवावं, अन्यथा ते तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करू शकतात.


विद्यार्थी (Student) - तरुणांनी आज आपल्या करिअरचा विचार करावा, त्या दृष्टीने पाऊल टाकून अभ्यासावर जोर दिला पाहिजे.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या मनात कोणत्या तरी गोष्टीविषयी एक प्रकारची अज्ञात भीती राहील. तुमचं मन शांत राहणार नाही आणि त्यामुळे तुमची प्रकृती बिघडू शकते. तुमची मानसिक स्थिती देखील चलबिचल राहील.


वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  


नोकरी (Job) - नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये उल्लेखनीय कामगिरी करताना दिसाल, याद्वारे तुम्ही इतरांच्या मनावरही चांगली छाप पाडाल.  


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या प्रयत्नांमुळे तुमचे कर्ज मंजूर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक मदत मिळेल आणि तुम्ही तुमचा व्यवसाय वाढवू शकाल.


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं तर, छंद जोपासण्यासाठी तुम्ही आज कोणत्याही महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष करू नये, कारण छंदापेक्षा काम महत्त्वाचं आहे.  


आरोग्य (Health) - आज आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहावं लागेल. तुम्ही आज कोणत्याही प्रकारच्या जड वस्तू उचलणं टाळावं, अन्यथा तुम्हाला पाठदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो.


धनु (Sagittarius Today Horoscope)


नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज तुम्ही कामाच्या ठिकाणी सकारात्मक दिसाल. सुरुवातीला काही लोक तुमचा विरोध करतील, पण हळूहळू लोकांना तुमची विचारसरणी आवडेल आणि तुमच्या कामाचीही प्रशंसा होईल


व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, मोठ्या व्यावसायिकांनी त्यांच्या आजच्या दिवसाबद्दल थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा तुम्हाला अचानक एखाद्या मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्हाला व्यवसायात नुकसान सहन करावं लागू शकतं. तुम्ही मानसिक तणावाखाली देखील येऊ शकता, जर तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी खूप मेहनत केली तर तुमचा व्यवसाय पुन्हा रुळावर येऊ शकतो.


विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे. आज मधेच तुम्ही जास्त खुश दिसाल, मधेच तुम्ही उदास दिसाल.


आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या आणि शरीर निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Shani Dev : शनीच्या उदयामुळे 'या' 5 राशीच्या लोकांना बसणार फटका; नोकरी-व्यवसायात मिळेल अपयश, वाढणार अडचणी