Horoscope Today 1 January 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 1 जानेवारी 2026 चा दिवस आहे. आजपासून नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तसेच, आजचा वार गुरुवार असल्या कारणाने हा दिवस आपण दत्तगुरुंना समर्पित करतो. आजच्या दिवशी भक्त दत्तगुरुंची पूजा करतात. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज अनेक राजयोगांसह महत्त्वाच्या ग्रहांचं देखील संक्रमण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आज नवीन वर्षाचा पहिला दिवस उत्तम असणार आहे. आज तुम्हाला कौटुंबिक सुख-शांती मिळेल. धनसंपत्तीचं आगमन होईल. तसेच, तुमचं आरोग्य पूर्वीपेक्षा चांगलं असेल. व्यवसायात तुमची प्रगती पाहायला मिळेल. तसेच, सूर्यदेवाला जल अर्पण करणं तुमच्यासाठी शुभकारक ठरेल.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी दिवसाची सुरुवात सकारात्मक असेल. तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, आवश्यकतेपेक्षा जास्त वस्तू तुम्ही खरेदी कराल. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. पिवळ्या वस्तू दान करणं लाभदायी ठरेल.

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

आज तुमचं मन काहीसं चिंतित असणार आहे. अचानक तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. तसेच, नोकरीत तुमची स्थिती फार चांगली असेल. जे लोक विवाहित आहेत त्यांच्या जीवनात आज तणाव निर्माण झालेला दिसू शकतो. लाल वस्तू दान करणं शुभकारक ठरेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

आज तुमचं मन प्रसन्न राहील. पण, तुमच्या शत्रूंचा दबदबा मात्र कायम असणार आहे. प्रेम आणि संतान प्राप्तीसाठी आज तुम्हाला कदाचित चिंतेत पाडणारा दिवस असेल. मात्र, आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

आज तुमच्यावर मानसिक दबाव कायम राहील. एकाच वेळी अनेक गोष्टी तुमच्या मनात सुरु असतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, घरात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं दिसेल. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, नवीन वर्षात तुमचे प्रवासाला जाण्याचे योग जुळून येणार आहेत. मुलांकडून तुम्हाला आनंदाची बातमी ऐकायला मिळेल.

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस सावधानतेचा असणार आहे. आज तुम्हाला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. मात्र, हा प्रवास तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवणारा असणार आहे. तुमचा व्यवसाय सुरळीत चालेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्हाला जोडीदाराची चांगली साथ लाभेल. तसेच, नवीन वर्षात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाना नशिबाची चांगली साथ मिळेल. आज मुलांकडून तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायात कदाचित गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. योग आणि प्राणायाम करणं लाभदायी ठरेल. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. आज तुमच्या खर्चात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुमचा भूतकाळ तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसात काही महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहाल.

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज जमिनीच्या संदर्भात तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, भौतिक सुख-संपत्तीचा तुम्ही लाभ घ्याल. तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी आजचा दिवस पराक्रमाचा असणार आहे. आज तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, कोर्ट-कचेरीच्या संदर्भातील तुमचे जुने वाद मिटतील. तुमचं आरोग्य चांगलं राहील. निळ्या वस्तू दान करणं शुभकारक राहील. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Happy New Year 2026 Wishes : नवं वर्ष, नवा आनंद, नवा उत्साह...नवीन वर्षाच्या प्रिय व्यक्तींना द्या 'या' हटके शुभेच्छा; पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश