Horoscope Today 04 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...


मेष रास (Aries Horoscope Today)


नोकरी (Job) - बॅंकिंगच्या क्षेत्राशी जे लोक संबंधित आहेत त्यांच्यासाठी आजाच दिवस चांगला जाणार आहे. सुरुवातच सकारात्मक असेल. 


व्यापार (Business) - व्यापारी वर्गातील लोक कामात तर मेहनत करतील. पण, तुम्हाला अपेक्षेप्रमाणे मेहनतीचं फळ मिळणार नाही त्यामुळे तुम्ही थोडे निराश असाल.


तरूण (Youth) - कुटुंबीयांबरोबर आज तुम्ही छान आनंदात वेळ घालवाल. तसेच, लवकरच फिरायला जाण्याची योजना आखू शकता. तसेच, मन:शांतीसाठी धार्मिक कार्यात सहभागी व्हा.


आरोग्य (Health) - त्वचेच्या संबंधित समस्यांमुळे तुम्हाला त्रास जाणवेल. पण, डॉक्टरांच्या उपचाराने तुम्हाला आरामही मिळेल.


वृषभ रास (Taurus Horoscope Today)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची सगळे प्रशंसा करतील. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल. 


व्यापार (Business) - आज तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. त्याचा प्रभाव तुमच्या वाणीवर दिसून येईल. 


तरूण (Youth) - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच अभ्यासात यश मिळेल. धैर्य सोडू नका. 


आरोग्य (Health) - आज तुमची तब्येत एकदम ठणठणीत असणार आहे. त्यामुळे काही चिंता करण्याची गरज नाही. 


मिथुन रास (Gemini Horoscope Today)


नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे.सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला पाठिंबा मिळेल. 


व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्तीत जास्त ऑर्डर्स मिळतील. त्यामुळे स्टॉक आधीच भरून ठेवा. 


तरूण (Youth) - तुमच्या करिअरशी संबंधित भावा-बहिणींचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. त्यामुळे तुम्हाला अभ्यास करण्यास अधिक ऊर्जा मिळेल. 


आरोग्य (Health) - जोडीदाराच्या आरोग्याशी संबंधित तुम्हाला चिंता सतावेल. त्यामुळे तुम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Numerology : अत्यंत हळव्या स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; नातं जपण्यात कधीही मागे हटत नाहीत; प्रत्येक पावलावर देतात साथ