Horoscope Today 04 March 2025: आज 04 मार्च म्हणजेच मंगळवारचा दिवस आहे. आजचा दिवस भगवान गणेशाला समर्पित आहे. तसेच, आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Today Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी आज आरोग्यास लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. कोणत्याही वादात पडणे टाळा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.

वृषभ रास (Taurus Today Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज मानसिक तणाव राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कामाचे नियोजन करता येईल. सामाजिक क्षेत्रापासून अंतर राखाल. पत्नीसोबत सुरू असलेले मतभेद मिटतील.

मिथुन रास (Gemini Today Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही काही मोठे काम सुरू करू शकता. कामात मोठी उलथापालथ होऊ शकते. आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि वादविवादापासून दूर राहा. कामात अडथळे येऊ शकतात. पत्नीशी मतभेद वाढतील, कुटुंबातील लोक नाराज होतील.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नोकरीच्या ठिकाणी मोठे यश संपादन करू शकाल. कार्यशैलीवर परिणाम होऊ शकतो. तणाव दूर होईल. कुटुंबात शुभ कार्ये होण्याची शक्यता आहे. नवीन कामही सुरू करू शकता. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

सिंह रास (Leo Today Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी आज कुटुंबातील लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील. तुम्ही तुमच्या वागण्याने लोकांची मने जिंकाल. नोकरदारांसाठी काळ चांगला राहील. कुटुंबासोबत लांबच्या प्रवासाला जाता येईल. कौटुंबिक तणाव दूर होईल.

कन्या रास (Virgo Today Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी आज तुम्ही मानसिक तणावाखाली राहाल. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागू शकते. कामाचा ताण वाढू शकतो. संपत्तीच्या वादावरून कुटुंबात वाद होऊ शकतात. विचारपूर्वक पैसे खर्च करा.

तूळ रास (Libra Today Horoscope) 

तूळ राशीच्या लोकांसाठी आज कामाच्या ठिकाणी तणाव राहील. तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीपासून वेगळे होऊ शकता. पत्नीशी मतभेद वाढतील. कुटुंबातील लोक तुमचे विरोधक होऊ शकतात. धार्मिक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio Today Horoscope) 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कर्जापासून मुक्ती मिळेल. नवीन काम सुरू करण्यात यश मिळेल. तुमचा वेळ खूप छान जाणार आहे. कुटुंबात काही शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कामाची व्याप्ती वाढेल.

धनु रास (Sagittarius Today Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी आज नोकरीच्या ठिकाणी काही नवीन काम सुरू करू शकता. अधिका-यांचे सहकार्य मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अनेक जुनी कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. कुटुंबात सुरू असलेला तणाव दूर होईल

मकर रास (Capricorn Today Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आज तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे घातक ठरेल. वादविवादापासून दूर राहा. वडिलोपार्जित मालमत्तेवरून कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतात.

कुंभ रास (Aquarius Today Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आज मान अपमान झाल्यामुळे तुम्ही दुखावले जाल. आरोग्याशी संबंधित समस्या असू शकतात. व्यवसायात स्थिती चढउतार होईल. गुंतवणूक करताना काळजी घ्या. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागेल. घरामध्ये शुभ कार्य होण्याची शक्यता आहे.

मीन रास (Pisces Today Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी आज कुटुंबात शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. सहलीला जाण्याचा बेत आखू शकता. तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते, अनावश्यक वाद टाळा.

हेही वाचा>>>

Navpancham Rajyog: टेन्शन सोडा! शनि-मंगळाचा शक्तिशाली राजयोग बनतोय, 'या' 3 राशीचे लोक राजासारखं जीवन जगणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )