April 2022 Calendar , zodiac sign :  आयुष्यातील प्रत्येकजण आपल्या यशाची आतुरतेने वाट पाहत असतो. होय, माणूस यशस्वी होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो पण बर्‍याच वेळा यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो. ज्योतिषानुसार आपल्या जीवनावर ग्रहांचा मोठा प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिल महिन्यात मेष राशीपासून ते मीन राशीच्या लोकांवर प्रभाव पडणार आहे. काही राशींची संपत्तीशी संबंधित  समस्या सुटणार आहे.  


एप्रिल 2022 मध्ये होणारे राशी परिवर्तन (April Transit 2022 Calendar)



  • 7 एप्रिल 2022 रोजी मंगळाचे कुंभ राशीत प्रवेश (Mars Transit 2022)

  • 8 एप्रिल 2022 रोजी बुध ग्रहाचा मेष राशीत प्रवेश (Mercury Transit 2022)

  • 12 एप्रिल 2022   रोजी राहुचा मेष राशीत प्रवेश (Rahu Transit 2022

  •  12 एप्रिल 2022  रोजी केतुचा तुळा राशीत प्रवेश (Ketu Transit 2022)

  • 13 एप्रिल 2022 बृहस्पतीचा मीन राशीत प्रवेश (Jupiter Transit 2022)

  • 14 एप्रिल 2022 सूर्याचा मेष राशीत प्रवेश  (Sun Transit 2022)

  • 25 एप्रिल 2022 बुध ग्रहाचा वृषभ राशीत प्रवेश (Mercury Transit 2022)

  • 27 एप्रिल 2022 शुक्र ग्रहाचा मीन राशीत प्रवेश (Venus Transit 2022)

  • 29 एप्रिल 2022 शनीचा कुंभ राशीत प्रवेश (Saturn Transit 2022)


राशीफळ 2022  (Horoscope 2022) : एप्रिल महिन्यात  कुबेरांची कृपा या राशीच्या लोकांवर पडणार आहे.


मिथून राशी (Gemini) - एप्रिल महिना मिथून राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. या महिन्यात अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होणार आहे. नव्या बातम्या मिळणार आहे. तसेच पुढे जाण्याची संधी देखील मिळणार आहे. लग्नात येणारे अडथळे दूर राहणार आहे.   वाहन, खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.


कन्या राशी (Virgo) - कन्या राशीच्या व्यक्तींना नोकरी बदलण्याची संधी मिळणार आहे. तसेच सरकारी सेवेत असणाऱ्या व्यक्तींना बदलीला सामोरे जावे लागणार आहे. काही लोकांसाठी ही बदली लाभदायक ठरणार आहे. नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन मिळेल. तसेच स्टार्टअप चालू करण्यासाठी चांगला योग आहे. गृहसजावटीसाठी नवी वस्तू खरेदी करू शकतात


मकर राशी (Capricorn) - मकर राशीमध्ये असणारा शनी  29 एप्रिलला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनीचे हे परिवर्तन संपत्तीच्या बाबतीत लाभदायक ठरणार आहे. नव्या संधींचा लाभ घ्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी. राग आणि अहंकारापासून दूर राहावे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा)


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha