Holashtak 2025: होळी हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. हिंदू धर्मात होलाष्टक अशुभ मानले जाते. या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. धार्मिक मान्यतेनुसार होलाष्टकाच्या काळात जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही शुभ कार्य केले, तर त्याला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. असे मानले जाते की, होलाष्टक दरम्यान कोणतेही शुभ कार्य केल्यास अनेक अडथळे येतात. होलाष्टकादरम्यान कोणतेही शुभ कार्य करण्यास पूर्णपणे मनाई आहे. तर जाणून घ्या होलाष्टक कधी सुरू होणार? यासोबत जाणून घ्या होळाष्टकादरम्यान कोणती कामे करू नयेत?

होलाष्टक म्हणजे काय?

होलाष्टक म्हणजे होळीच्या आधीचे ते आठ दिवस जे शुभ मानले जात नाहीत. लग्न, मुंडन आणि इतर धार्मिक विधी यासारखी सर्व शुभ कार्ये होलाष्टकात करू नयेत. यंदा फाल्गुन मासातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून होलाष्टक सुरू होत आहे. ती होळीच्या दिवशी संपेल

होलाष्टक कधी सुरू होतंय?

हिंदू दिनदर्शिकेनुसार होळीच्या 8 दिवस आधी होलाष्टक सुरू होते. 2025 वर्षी होलाष्टक 7 मार्च 2025 पासून सुरू होत आहे. 13 मार्चला होलिका दहनाच्या दिवशी होलाष्टक संपेल.

होलाष्टक अशुभ का आहे?

होलाष्टकच्या आठ दिवसांपर्यंत हिरण्यकश्यपने भक्त प्रल्हादला भगवान विष्णूची भक्ती सोडण्यासाठी अनेक प्रकारे अत्याचार केले. पण भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या भक्तीत तल्लीन राहिला. शेवटी, प्रल्हादचा जीव वाचवण्यासाठी भगवान विष्णूने नरसिंहाचे रूप धारण केले आणि हिरण्यकश्यपचा वध केला.

होलाष्टक दरम्यान कोणती कामे करू नयेत?

  • होलाष्टकादरम्यान लग्न, लग्नाची बोलणी आणि घर भरणी यासारखी शुभ कार्ये करू नयेत.
  • होलाष्टकादरम्यान नवीन घर, जमीन, वाहन खरेदी करणे किंवा पैसे गुंतवणे यासारखी कामे करू नयेत.
  • होलाष्टकच्या वेळी दाढी करू नका.
  • होळाष्टक दरम्यान दुकानाचे उद्घाटन करू नये. 
  • कोणताही नवीन व्यवसाय सुरू करू नका.

होलाष्टक दरम्यान काय काम कराल?

  • होलाष्टक दरम्यान गरीब आणि गरजूंना धान्य, कपडे आणि पैसे दान करा. असे केल्याने तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल.
  • होलाष्टकात पूजा आणि जप करा. असे केल्याने शुभ फल प्राप्त होते.
  • होलाष्टकात विष्णु सहस्रनाम, हनुमान चालीसा आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा.
  • होलाष्टकात पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

होळी कधी आहे?

होळीचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी खास असतो. यंदा होळी सण 13 मार्च रोजी सकाळी 10:35 वाजता सुरू होईल आणि 14 मार्च रोजी दुपारी 12:23 वाजता संपेल. अशा प्रकारे, यावर्षी धुलिवंदनाचा सण 14 मार्च 2025 रोजी साजरा केला जाईल. 

हेही वाचा>>>

Navpancham Rajyog: टेन्शन सोडा! शनि-मंगळाचा शक्तिशाली राजयोग बनतोय, 'या' 3 राशीचे लोक राजासारखं जीवन जगणार, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )