Holi 2025 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, होळीचा (Holi 2025) सण हा आनंद, सुख-समृद्धीचा सण मानला जातो. या दिवशी लोक आपापसांतील हेवेदावे, मतभेद विसरुन पुन्हा एकत्र येतात. यामुळेच आपण वर्षभर या सणाची आतुरतेने वाट पाहतो. होळी दोन दिवशी साजरी करतात. पहिला दिवस असतो तो म्हणजे होळीचा आणि दुसरा दिवस असतो धूलिवंदनाचा. त्यानुसार, यंदा होलिका दहन 13 मार्च रोजी आहे आणि धूलिवंदन 14 मार्च रोजी असणार आहे. 

वास्तूशास्त्रानुसार, होळीच्या आधी 5 वस्तू घरात आणणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच, आपलं भाग्य उजळतं. या वस्तू नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

पिवळ्या रंगाचं कापड किंवा हळकुंड

वास्तू शास्त्रानुसार, हळदीला शुभ मानलं जातं. तसेच, हळदीला शुभ कार्याचं आणि लक्ष्मी नारायणाचं प्रतीक देखील मानलं जातं. मान्यतेनुसार, पिवळा रंग पिवळा रंग हा धन-संपत्तीला आकर्षित करणारा रंग मानला जातो. जर तुम्ही होळीच्या आधी घरी हळकुंड आणून त्याला पिवळ्या कापडात बांधून पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवल्यास भरपूर लाभ मिळतो. हा उपाय केल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होते. 

चांदीचा कासव 

वास्तूशास्त्रानुसार, चांदीच्या कासवाला स्थिरता आणि आर्थिक वृद्धीचा संकेत मानला जातो. त्यामुळेच होळीच्या आधी घरात कासव आणून तो    आणणं शुभ मानलं जातं. कासव घरात आणून तो उत्तर दिशेला ठेवावा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. तसेच, घरात धनसंपत्तीचं आगमन होतं. 

श्री यंत्रधन 

जर तुमच्यावर कर्जाचा डोंगर असेल. किंवा जर तुमचं काम नीट होत नसेल तर तुमच्या घरात तुम्ही श्री यंत्रधन ठेवू शकता. हे यंत्र तुम्ही होळीच्या एक दिवस आधी आणून पूजा केल्यानंतर घरात लावू शकता. तसेच, या यंत्राला तुम्ही घराच्या उत्तर दिशेला लावावं. असं केल्यास सर्व समस्या दूर होतात. 

गणरायाची मूर्ती 

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, घरात लक्षी-गणेशाची प्रतिम ठेवणं फार शुभ मानलं जातं. यासाठीच होळीच्या आधी तुम्ही गणरायाची प्रतिमा आणून त्याची विधीवत पूजा करा. आणि मूर्तीला मंदिरात स्थापन करा. असे केल्यास देवी लक्ष्मी आणि गणपतीची तुमच्यावर सदैव कृपादृष्टी राहील. आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Gochar 2025 : होळीनंतर 'या' 3 राशी होतील मालामाल; कर्मफळदाता शनीची असणार कृपादृष्टी, चुंबकासारखा पैसा हातात खेळणार