Holi 2024: होळी रे होळी पुरणाची पोळी... (Puranpoli)  हे  आपण लहानपणापासून म्हणत आलो आहे. होळीच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात  पुरणपोळी बनवली जाते. होळीच्या दिवशी पुरणपोळी खाणे शास्त्र असते असे म्हणत आपण मस्त पुरणपोळीवर ताव मारतो. मात्र कधी विचार केला का होळीला (Holi 2024) पुरणपोळीच का बनवली जाते? नाही ना... मग आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे की होळीला पुरणपोळीच का बनवली जाते काय आहे त्यामागील शास्त्र चला तर जाणून घेऊया..


राज्यभरात होळी किंवा शिमगा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक वाईट प्रवृत्तींचा होळीच्या अग्नीत त्याग केला जातो.वाईट प्रवृत्तीवर मिळावलेल्या विजयाचा आनंद म्हणून घराघरात पुरणपोळीचा बेत आखला जातो. 
भारत हा कृषीप्रधान देश आहे.  भारतात साजरे केलेले सर्व सण किंवा सणांना बनवण्यात येणारे सर्व खाद्यपदार्थ कृषी कालगणना (इंग्रजीमध्ये अॅग्रीकल्चरल कॅलेंडर) यांच्याशी संबधीत असते. शेतात प्रत्येक हंगाम किवा ऋतुनुसार येणाऱ्या पिकांवर नैवेद्य दाखवला जातो. 


पुरणपोळी बनवण्यामागे काय आहे कारण? (What is Reason Behind that?) 


 होळी हा सण साधारणपणे मार्च महिन्यात येतो. मार्च महिन्यात रब्बी पिकांची कापणी होते. रब्बी पिके म्हणजे जी पिके थंडीच्या काळात नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान  घेतली जातात . तर कापणी ही फेब्रुवारी ते मार्च दरम्यान होते. पुरणपोळीसाठी वापरण्यात येणारे गहू, चणा डाळ आणि  गुळ ही रब्बीची पिके आहेत. नवीन कापणी केलेल्या  पिकांचा वापर करुन विधिवत प्रसाद बनवत तो देवाला अर्पण केला जातो. घरात कोणती नवी गोष्ट विकत घेतल्यानंतर ती सर्वप्रथम देवासमोर ठेवली जाते. त्याप्रमाणेच शेतकरी देखील आपल्या शेतात पिकलेले पदार्थ देवाला अर्पण केले जातात. म्हणून आलेली पिकांचा प्रसाद देवाला दाखवला जातो. हंगामातील गोडधोड पदर्थ बनले. भारत हा कृतज्ञताप्रधान देश आहे. नवीन पिकांचा वापर करत शेतकरी आपली कृतज्ञता व्यक्त करतो. म्हणून होळीला पुरणपोळी केली जाते.  


कधी आहे होळी? (When to Celebrate Holi) 


वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचगानुसार  होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून .आला आहे. पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला 25 मार्च 2024 रोजी या नव्या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होणार आहे. एक , दोन नव्हे तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. त्यामुळे वर्षातील पहिले ग्रहण हे अतिशय खास असणार आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :


यंदा 100 वर्षांनी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग!'या' पाच लोकांनी चुकूनही पाहू नका होलिका दहन, अन्यथा होळीचा होईल बेरंग