Holi 2024: होलिका दहन (Holika Dahan 2024) दरवर्षी फाल्गुनच्या पौर्णिमेच्या तिथीला केले जाते. या दिवशी लोक पूजा करतात आणि काही ठिकाणी एकत्रितपणे ‘होलिका दहन’ केले जातात. होळीची विधिवत पूजा केली जाते. होलिका दहनला काही ठिकाणी संवत जाळणे, शिमगा देखील म्हटले जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. दुसर्या दिवशी होळीचा सण साजरा केला जातो. यावेळी होळी 24 मार्च 2024 रोजी आहे (Holika Dahan 2024).
वर्षभर लोक होळीच्या सणाची वाट पाहतात. काही ठिकाणी होळीच्या महिनाभर अगोदर तयारी सुरू होते. हिंदू पंचगानुसार होलिका दहन हे फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला केले जाते आणि दुसऱ्या दिवशी रंगांची होळी खेळली जाते. यंदा होलिका दहन 24 मार्चला होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 मार्चला धुलीवंदन असणार आहे होलाष्टक 8 दिवसांपूर्वी म्हणजेच 17 मार्चपासून सुरू झाला आहे. शास्त्रानुसार होलिका दहनाच्या काही प्रथा आणि परंपरा आहेत. यंदा तर 100 वर्षानंतर होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा योग जुळून आला आहे. शास्त्रानुसार काही लोकांनी होळी पाहणे शुभ मानले जात नाही. आज त्याविषयी जाणून घेऊया
नववधू
शास्त्रानुसार लग्नानंतर पहिल्यांदा सासरी आलेल्या नववधूने होलिका दहन पाहू नये. हे शुभ मानले जात नाही. असे म्हटले जाते की, यामुळे वैवाहिक जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
गर्भवती महिला
गर्भवती महिलांनीही होलिका दहन पाहणे टाळावे. याशिवाय गर्भवती महिलांनी होळीला प्रदक्षिणा घालणे देखील अशुभ मानले जाते. यामुळे दोष निर्माण होऊ शकतो आणि होणाऱ्या बाळावर अशुभ परिणाम होऊ शकतो ज्यामुळे त्याच्या भावी जीवनात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात.
नवजात बाळ
शास्त्रानुसार होलिका दहन नवजात बाळालाही दाखवू नये. असे केल्याने तुमच्या मुलाला नकारात्मकतेचा सामना करावा लागू शकतो. नकारात्मक ऊर्जा बाळावर परिणाम करू शकते. असे म्हटले जाते की होलिका दहनात प्रत्येकजण आपल्या नकारात्मकतेचा त्याग करण्यासाठी येतो.
सासू- सुनेने एकत्र पाहू नये होळी
सासू आणि सुनेने कधीही होलिका दहन एकत्र पाहू नये, असे म्हटले जाते. परस्पर मतभेद वाढू शकतात आणि नात्यात कटुता निर्माण होऊ शकते. घरामध्ये त्रास वाढण्याचीही शक्यता आहे.
एकच अपत्य असलेल्या पालकाने
एकुलते एक अपत्य असलेल्या पालकांनी होलिका दहनाचा अग्नी पाहणे टाळावे. हे शुभ मानले जात नाही. घरातील ज्येष्ठ व्यक्तीने होलिका दहनाच्या परंपरांचे पालन करावे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :