Holi 2023 : होळी हा रंगांचा सण असून तो देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. होळी केवळ हिंदूच नव्हे तर विविध संस्कृती आणि इतर धर्माचे लोकही साजरी करतात. म्हणूनच होळीला एकतेचा आदर्श ठेवणारा सण म्हटले जाते. या दिवशी विविध धर्म आणि समुदायाचे लोक रंगांची उधळण करून होळीचा सण साजरा करतात.
तुमच्या मनोकामना पूर्ण होतील
होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी केले जाते. होलिका दहनाची परंपरा विष्णू भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू आणि होलिका यांच्याशी संबंधित आहे. होलिका दहनाच्या वेळी होलिकेची पूजा करतात आणि अनेक वस्तू अर्पण करतात. ज्योतिषशास्त्रानुसार होलिकेच्या अग्नीत तीन पदार्थ अर्पण करून प्रदक्षिणा केल्यास मनोकामना पूर्ण होतात. त्याबद्दल जाणून घ्या..
होलिकेत हे तीन गोष्टी अवश्य अर्पण करावेत
फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी होलिका दहनाच्या वेळी महिला होलिकेची पूजा करतात आणि विविध पूजेचे साहित्य होलिकेला अर्पण करतात. गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या, गव्हाच्या पीकाच्या ओंब्या आणि नारळ इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे. होलिकाला अर्पण केलेल्या या साहित्यामागे काही मूल्ये दडलेली असतात. ती जाणून घ्या
गव्हाच्या पीकाच्या ओंब्या- हे नवीन धान्याचे प्रतीक आहे. जेव्हा गव्हाचे पीक घेतले जाते. तेव्हा देवाचे आभार मानण्यासाठी होलिकेत गव्हाच्या पीकाच्या ओंब्या अर्पण केल्या जातात. म्हणूनच अग्नीला अन्न अर्पण करतात
गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांची माळ- अग्नी आणि इंद्र हे वसंत ऋतूच्या पौर्णिमेच्या देवता मानले जातात. गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्यांची माळ अग्नीला अलंकार घालण्याचे प्रतीक म्हणून अर्पण केली जाते.
नारळ- नारळाला श्रीफळ असेही म्हणतात. होलिका दहनात अर्पण केल्यानंतर ते पुन्हा प्रसाद म्हणून काढले जाते आणि कुटुंबातील सर्व सदस्य ते प्रसाद म्हणून वाटप करतात.
होलिका दहनाच्या दिवशी हे काम अवश्य करावे
-सकाळी उठल्यावर स्नान करून भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि आपल्या गुरुदेवांची पूजा करावी.
-पूजा केल्यानंतर घरातील ज्येष्ठांकडून आशीर्वाद घ्या.
-होलिका दहनाच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार काही गरजूंना दान द्या. यामुळे पुण्य भरपूर मिळते.
-ज्योतिषशास्त्रानुसार, होलिकेच्या तीन परिक्रमेने तुमच्या इच्छा पूर्ण होतील
प्रदक्षिणा अत्यंत महत्त्वाची
होलिका पूजन आणि दहनाच्या वेळी प्रदक्षिणा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रदक्षिणा करताना खऱ्या मनाने व पूर्ण भक्तीभावाने मनोकामना केली तर ती निश्चितच पूर्ण होते. तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार होलिकेची प्रदक्षिणा करायची आहे, आणि होलिकेला मनापासून प्रार्थना करायची आहे, जेणेकरून तुमच्या इच्छा पूर्ण होतील
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या
Holi 2023 : होळी रे होळी! मतभेद विसरून लोकांना एकत्र आणणारा सण, महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या