Hindu Religion: अनेकदा आपले जेव्हा डोळे फडफडतात, तेव्हा आपल्या घरातील ज्येष्ठ माणसं आपल्याला त्यावर शुभ किंवा अशुभ संकेताबाबत सांगतात. पुरुषांच्या आणि महिलांच्या डोळे फडफडण्याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. भारतात प्राचीन काळापासून समुद्रशास्त्राच्या आधारे भविष्य वर्तवले जात आहे. हे शास्त्र आपल्या शरीराच्या अवयवांशी संबंधित चिन्हे आणि त्यांच्या कार्याबद्दल भविष्यवाणी करते. यापैकी एक लक्षण म्हणजे डोळे फडफडणे. तुमचे डोळे कधी फडफडायला लागलेत आणि तुम्ही विचार करू लागलात की यामागचे संकेत काय असू शकते? ज्योतिषशास्त्र आणि समुद्रशास्त्रानुसार डोळे फडफडणे हे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना दर्शवू शकते. जाणून घेऊया पुरूष आणि महिलांचा कोणता डोळा फडफडणे शुभ किंवा अशुभ मानले जाते?
स्त्रियांचा उजवा डोळा फडफडणे म्हणजे शुभ कि अशुभ?
समुद्र शास्त्रानुसार स्त्रियांचा उजवा डोळा फडफडणे हे अशुभ लक्षण मानले जाते. यामागे काही अप्रिय घटना घडणार आहे, त्यामुळे महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकतात, असा विश्वास आहे. हे संकेत एक चेतावणी देखील असू शकते की लवकरच काही समस्या उद्भवू शकतात.
पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे म्हणजे काय?
ही परिस्थिती पुरुषांसाठी पूर्णपणे उलट आहे. पुरुषांचा उजवा डोळा फडफडणे हे शुभ लक्षण मानले जाते. याचा अर्थ असा की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी किंवा आर्थिक लाभ मिळेल. हे लक्षण काही चांगले बदल दर्शवते.
एकाच वेळी दोन्ही डोळे फडफडणे म्हणजे काय?
काहीवेळा असे देखील होते की, दोन्ही डोळे एकाच वेळी फडफडू लागतात. या स्थितीत शुभ की अशुभ याची लोकांना काळजी वाटते. समुद्र शास्त्रानुसार, जर दोन्ही डोळे एकत्र फडफडत असतील तर हे लक्षण आहे की तुमचा एखादा जुना किंवा हरवलेला मित्र लवकरच भेटू शकतो.
ज्योतिषशास्त्राप्रमाणे वैज्ञानिक कारणही...
हिंदू धर्म हा निश्चितच श्रद्धा आणि विश्वासावर आहे, परंतु धर्मग्रंथांच्या आधारे केलेली गणना विज्ञानाप्रमाणेच कसोटीला उतरते. जर वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहायला गेलं तर डोळा फडफडणे ही देखील एक सामान्य शारीरिक प्रतिक्रिया असू शकते जी तणावामुळे किंवा डोळ्यातील काही समस्यांमुळे असू शकते. परंतु ज्योतिषशास्त्र आणि समुद्रशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहायला गेल्यास, हे लक्षण आपल्याला सावध करते की भविष्यात काहीतरी चांगले किंवा वाईट होऊ शकते. समुद्र शास्त्र आणि ज्योतिष शास्त्राच्या समजुतीनुसार, डोळे फडकावण्याचे वेगवेगळे संकेत आहेत ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो. पण त्याकडे अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून पाहू नये. हे एक प्राचीन विज्ञान आहे, जे आपल्या पूर्वजांनी अनुभवले आहे आणि आपण त्यांच्या श्रद्धांचा आदर केला पाहिजे.
हेही वाचा>>>
Hindu Religion: अंत्यसंस्कार करताना बहुतेक पुरुषांचा शरीराचा 'हा' भाग जळत नाही, या भागाचे काय केले जाते? हिंदू धर्मात काय म्हटलंय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )