Hartalika 2025: आजचा दिवस महिलांसाठी खास आहे. आज हरतालिका तृतीया आहे, पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला साजरी केली जात आहे. मान्यतेनुसार, हरतालिका तृतीया व्रत हे एक कठीण व्रत आहे, ज्यामध्ये काही महिला निर्जलीय व्रत ठेवतात. अशात अनेकांच्या मनात एक विचार नक्की येतो. जर एखाद्या महिलेचा हरतालिकेचा उपवास चुकून मोडला तर काय करावे? अशात महिलांनी उपवास मोडला तर घाबरू नये, तर काही विशेष उपाय करावेत आणि माता पार्वतीची माफी मागून तिला प्रसन्न करावे. काही उपायांबद्दल जाणून घेऊया. चुकून उपवास मोडल्यास कोणते सोपे आणि प्रभावी उपाय करावेत ते जाणून घेऊया.
चुकून काही खाल्ले असेल तर..
शास्त्रानुसार, जर तुम्ही हरतालिका उपवासात चुकून काही खाल्ले असेल आणि व्रत मोडले असेल तर माता पार्वती आणि भगवान शिव यांना पंचामृताने स्नान घाला आणि नंतर पंचोपचार पूजा करा आणि क्षमा मागा. पूजा केल्यानंतर, आरती करा आणि पूजा पूर्ण करा.
सोपा आणि प्रभावी उपाय
हरतालिका उपवास दरम्यान झोप लागणे, कथा ऐकू न येणे आणि चुकून उपवास मोडणे, या सर्वांमुळे उपवासात दोष निर्माण होतात, ज्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सौभाग्य साहित्य दान करणे हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. हळद दान करा, मंदिरात जा आणि माता पार्वतीकडून क्षमा मागा.
ब्राम्हणाचा सल्ला घ्या
जर हरतालिका व्रत चुकून मोडले असेल, तर तुम्ही तुमच्या पंडित किंवा पुरोहितांचा सल्ला घेतला पाहिजे. पंडितजी तुम्हाला दान कसे आणि केव्हा करावे किंवा ब्राह्मणांना जेवण कसे द्यावे याबद्दल तपशीलवार सांगू शकतात. तुमची भक्ती आणि श्रद्धा ठेवा, तरच भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतील.
देवीची माफी
शास्त्रानुसार, हरतालिका व्रतात दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा केल्यानंतर उपवास सोडण्याचा नियम आहे. शास्त्रानुसार, जर हरतालिका तृतीया व्रत चुकून मोडले तर भगवान शिव आणि देवी पार्वतीची क्षमा मागा. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. याशिवाय, तुमच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी देवाला प्रार्थना करा. भविष्यात अशी चूक होणार नाही आणि पुढील हरतालिका व्रत मोडणार नाही याची पूर्ण काळजी घ्या असा दृढ निश्चय करा.
घाबरू नका..
जर हरतालिका तीज व्रत चुकून मोडले असेल, तर घाबरू नका आणि माता पार्वतीची माफी मागा. जर तुम्ही चुकून काही खाल्ले असेल, तर ताबडतोब तुळशीच्या पानांचे सेवन करा. लक्षात ठेवा की जाणूनबुजून उपवास सोडू नका, असे केल्याने तुम्हाला उपवासाचे फळ मिळणार नाही.
हेही वाचा :
Ganesh Chaturthi 2025: आतुरता संपणार! गणेश चतुर्थीला बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा अचूक मुहूर्त! राहुकाळ कोणता? गौरी पूजन, विसर्जनाचाही योग्य मुहूर्त जाणून घ्या
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)