Astrology : हिंदू धर्मात हळदीला अत्यंत पवित्र मानले जाते. हळदीशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. हळदीला आयुर्वेदात औषध मानले जाते. हळदीची खासियत केवळ मसाल्यांपुरती मर्यादित नाही. हळदीचा उपयोग ज्योतिषशास्त्रातही अनेक प्रकारे केला जातो.


 


आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी हळद प्रभावी


भगवान विष्णूंना हळद खूप प्रिय आहे, त्यामुळे हळदीच्या काही उपाय गुरुवारी अधिक प्रभावी मानले जातात. हळदीचे उपाय केवळ नशीब उघडण्याचे काम करत नाहीत तर आर्थिक स्थिती मजबूत करतात. जन्मपत्रिकेत गुरूची स्थिती मजबूत करण्यासाठी हळद देखील खूप प्रभावी मानली जाते. जाणून घ्या हळदीशी संबंधित काही उपाय.


 



हळदीशी संबंधित उपाय, देवी लक्ष्मीही प्रसन्न होते



जर तुमचे पैसै कुठेतरी अडकले असेल किंवा एखादे कामात बराच काळ अडकले असेल तर तांदळाला हळदीचा रंग लावा आणि लाल कपड्यात बांधून पर्समध्ये ठेवा. असे केल्याने अडकलेला पैसा लवकर मिळतो.



खूप मेहनत करूनही यश मिळत नसेल तर बुधवार किंवा गुरुवारी गणपतीला हळकुंडाचा हार अर्पण करा. असे केल्याने कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात.


 


हळदीने भिजवलेला एक गोळा लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा आणि रोज त्याची पूजा करा. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते.



जर तुम्ही कोणत्याही शुभ कार्यासाठी जात असाल तर गणेशाला हळदीचा टिळा लावा, नंतर कपाळावर हळदीचा टिळा लावून घरातून बाहेर पडा. असे केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि कार्यात प्रगती होते.


 


जर तुम्हाला वाईट नजर लागली असेल किंवा तुम्हाला वाईट स्वप्ने पडत असतील तर हळकुंड डोक्यावर ठेवून झोपा. असे केल्याने वाईट स्वप्ने येणे थांबते.


 


गुरू बृहस्पती आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हरभरा डाळ आणि हळद दान करा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तींसमोर दररोज चिमूटभर हळद अर्पण केल्याने एखाद्याला इच्छित जोडीदार मिळतो. 



या उपायाने वैवाहिक जीवनातील अडथळाही दूर होतो.


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Chanakya Niti : प्रेमच आहे प्रत्येक नात्याचा आधार! व्हॅलेंटाईन डे निमित्त चाणक्यांची 'ही' गोष्ट ज्याला समजली, त्याने जग जिंकलेच समजा!