Guru Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र सुमारे 26 दिवसांनी आपली राशी बदलतो. नोव्हेंबर महिन्यात शुक्र धनु राशीत प्रवेश करणार आहे. या काळात शुक्र आणि गुरु एकमेकांच्या राशीमध्ये स्थित असतील. अशा स्थितीत, परिवर्तन राजयोगाची निर्मिती होत आहे. वैदिक पंचांगानुसार, शुक्र 7 नोव्हेंबरला पहाटे 3.39 वाजता गुरूच्या राशीत, म्हणजेच धनु राशीत प्रवेश करेल आणि 28 डिसेंबरपर्यंत या राशीत राहील. या काळात गुरु ग्रह आधीच शुक्राच्या वृषभ राशीत असणार आहे. त्यामुळे हा काळ कोणत्या राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे? जाणून घेऊया.


मेष रास (Aries)


मेष राशीच्या लोकांसाठी परिवर्तन योग खूप फायद्याचा ठरू शकतो. या काळात तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुम्ही केलेल्या मेहनतीचं कौतुक होईल. तुम्हाला प्रमोशनसोबत चांगली इन्क्रीमेंट मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. पैशाशी संबंधित अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. जोडीदारासोबत तुमचा वेळ चांगला जाईल, पण थोडा धीर धरायला हवा.


मिथुन रास (Gemini)


परिवर्तन राजयोगाचा या राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. यासोबतच तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवता येईल. नोकरीमुळे तुम्हाला खूप प्रवास करावा लागू शकतो, पण याच्या मदतीने तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. यामुळे तुम्ही जास्त खर्च करू शकता. लव्ह लाईफ चांगलं जाणार आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडं सावध राहण्याची गरज आहे.


मकर रास (Capricorn)


या राशीच्या लोकांसाठी शुक्राचं संक्रमण फायदेशीर ठरू शकतं. या राशीच्या लोकांवर शुक्रासोबतच गुरूची कृपा राहील. या राशीच्या लोकांचा अध्यात्माकडे जास्त कल असू शकतो. करिअर क्षेत्राबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला परदेशात नोकरीच्या संधी मिळतील. यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल समाधान वाटू शकतं. व्यवसायाच्या क्षेत्राविषयी बोलायचं झालं तर, तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांना कडवी टक्कर देताना दिसतील. तुम्ही व्यवसायात भरपूर नफा कमवू शकता. आरोग्याची काळजी घ्या.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Shani 2024 : दिवाळीनंतर शनीची थेट चाल; 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह धनात होणार अपार वाढ