Guru Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 28 जून 2025 रोजी म्हणजेच उद्या गुरु ग्रह (Guru Gochar) राहूच्या आद्रा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरु ग्रहाचं संक्रमण हा ग्रहांच्या महत्त्वाच्या संक्रमणातला एक बदल आहे. कारण गुरु ग्रह हा ज्ञान, समृद्धी, विवाह, संतानसुख आणि धार्मिक उन्नती यांचा कारक आहे. राहूच्या नक्षत्रात येताना गुरुच्या परिणामात थोडा गूढपणा, अपारंपरिक विचारसरणी, अचानक लाभ किंवा नुकसान अशी वैशिष्ट्ये दिसून येतात. या ठिकाणी डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी गुरुच्या संक्रमणाने कोणत्या राशींना (Zodiac Signs) सर्वात जास्त लाभ मिळेल या संदर्भात माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात.
कोणत्या राशींना फायदा होईल?
1. मेष रास (Aries Horoscope)
गुरू हा तुमच्या राशीच्या दुसऱ्या स्थानात (धन स्थानात) जातो आहे.
आर्थिक लाभ, अचानक संपत्ती, कौटुंबिक वाढ
वाणी प्रभावी होईलखर्चावर नियंत्रण ठेवावा
2. कर्क रास (Cancer Horoscope)
गुर 11व्या लाभ स्थानात येईल.
उत्पन्नात वाढ, नवीन संधी, जुनी थकीत रक्कम परत मिळेलमित्रांचा आणि वरिष्ठांचा सहकार्य लाभेल
3. सिंह रास (Leo Horoscope)
गुरू दहाव्या कर्म स्थानात येईल.
करिअरमध्ये प्रगती, बढती, नवी जबाबदारीउच्च अधिकाऱ्यांकडून संधी
4. धनु रास (Sagittarius Horoscope)
गुरू पंचम स्थानात - अतिशय शुभ
विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळप्रेमसंबंध, संतानसुख, भाग्यवृद्धी
5. मीन रास (Pisces Horoscope)
स्वगृही गुरू — चौथे स्थान
घर, वाहन, स्थावर संपत्तीचे योगमानसिक समाधान, कुटुंबासोबत वेळ
विशेष सूचना :
राहूच्या नक्षत्रातील गुरू काही राशींना आध्यात्मिक वाटचाल, पण गोंधळाचे निर्णयही देऊ शकतो.उपाय म्हणून दर गुरुवारी हळदीचा तिलक, विष्णु सहस्त्रनाम किंवा “ॐ गुरवे नमः” जप करावा.
- डॉ. भूषण ज्योतिर्विद
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :