Astrology Panchang 8 June 2025 : आज 8 जून रविवारचा दिवस. आज चंद्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे. तसेच, सूर्यदेवाने मृगशिरा नक्षत्रात प्रवेश केला आहे. आजच्या दिवशी परिध योग (Yog), सर्वार्थ सिद्धी योग तसेच, स्वाती नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे.
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आजच्या दिवशी जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशीचे लोक धार्मिक कार्यात सहभागी होतील. तसेच, तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. या लकी राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फार शुभ असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगलं यश मिळेल. त्यामुळे हा दिवस तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. तसेच,आजच्या दिवशी तुम्ही वीकेंडचा आनंद घ्याल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. तुमच्या बुद्धिमत्तेला चांगला वाव मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला शांत वातावरण पाहायला मिळेल. तुमच्या अपेक्षेपेक्षा चांगलं काम आज तुम्ही कराल. त्यात तुमचं मन रमेल. तसेच, लहान मुलांसाठी आजचा दिवस फार कलात्मक असणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
आजच्या दिवसात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, प्रॉपर्टीच्या संदर्भातील तुमची जी काही कामे असतील ती पूर्ण होतील. तसेच, तुम्हाला वाहन चालवण्याचा आनंद घेता येईल. आज संध्याकाळी घरी पाहुण्यांचं आगमन होऊ शकतं.मित्रपरिवाराबरोबर तुमच्या भेटीगाठी वाढतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना चांगली नोकरी मिळण्याचे संकेत आहेत. तसेच, कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी आजचा दिवस फार खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे काम करु शकता. याचा तुम्हाला आनंद घेता येईल. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन फार चांगलं असणार आहे. मुलांकडून आज तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :