Grahan Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, राशीचक्रात सर्वच ग्रह ठराविक अंतराने राशी परिवर्तन करतात. ग्रहांच्या या संक्रमणामुळे शुभ-अशुभ योग जुळून येतात. या दोन्ही योगाचा आपल्या भाग्यावर परिणाम होतो. शुभ योग जुळून आल्याने जशी आपली रखडलेली कामे पूर्ण होतात तसेच, अशुभ योगामुळे अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. या 16 जूनला असाच अशुभ योग जुळून येणार आहे. या दिवशी राहू आणि चंद्राची कुंभ राशीत युती होणार आहे. यामुळे ग्रहण योग निर्माण होणार आहे. 

'या' राशींवर ग्रहणाचा होणार परिणाम 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी ग्रहण योग निर्माण होणं फार आव्हानात्मक ठरणार आहे. राहू-चंद्राच्या युतीने तुमच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची अनेक रखडलेली कामे राहतील. तसेच, तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होईल. अनेक प्रकारचे वाईट विचार तुमच्या मनात येतील. त्यामुळे तुमचं मन सतत विचलित राहील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, हा ग्रहण योग तुमच्यासाठी फार नुकसानकारक ठरेल. या दरम्यान तुमचा दिर्घकालीन आजार तुम्हाला पुन्हा जाणवेल. तसेच, तुमच्या व्यवसायात तुम्हाला प्रचंड नुकसान होऊ शकतं. या दरम्यान तुमचा वाईट काळ टाळण्यासाठी विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवा. 

मीन रास (Pisces Horoscope)

या राशीच्या कुंडलीत राहू ग्रह बाराव्या स्थानी आहे. याबरोबर चंद्र ग्रहसुद्धा आहे. या दोन्ही ग्रहांची अशुभ युती होणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी तुम्हाला जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच, या वाईट काळात भगवान हनुमानाच्या मंत्राचा जप करा. या काळात तुमची मानसिक शांतता भंग होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                                       

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी जून महिन्याचा तिसरा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य