Grah Gochar: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. फेब्रुवारी  महिना संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यानंतर मार्च महिना सुरू होणार आहे. मार्च महिना ग्रह- नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.  या महिन्यात चार ग्रह आपली चाल बदलणार आहे. मार्च महिन्यात बुध, शुक्र, सूर्य, मंगळ ग्रह आपली राशी बदलणार आहे.  मार्च महिन्यात बुध, शुक्र, सूर्य  आणि मंगळ ग्रहाच्या स्थितीत बदल होणार आहे. यामुळे राशीचक्रावर परिणाम दिसून येणार आहे. प्रत्येक ग्रहांच्या स्थितीनुसार राशीचक्रावर परिणाम होईल. कोणत्या राशीला चांगले आणि कोणत्या राशीला अनिष्ठ फळ मिळणार तसेच ग्रह गोचरचा राशीचक्रावर कसा परिणाम होणार  चला जाणून घेऊयात. 


मेष राशी (Aries)


मार्च महिन्यात होणाऱ्या ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा सर्वात जास्त फायदा मेष राशीला होणार आहे. सूर्य देवाच्या कृपेने या राशीच्या सर्व समस्या सुटणार आहे. तसेच तुमचा मान सन्मान वाढणार आहे. तुम्हाला पगारापेक्षा अधिक पैसे कमवण्याची संधी मिळेल. या आठवड्यात नोकरीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मेष राशीचे लोक मार्च महिन्याची सुरुवात एखाद्या नव्या कामाने करतील. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीवर तुमचे वरिष्ठ खूश राहतील.मेष राशीच्या लोकांना शनी उदयाचा देखील मोठा फायदा मिळणर आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. परदेशात जाण्याची संधी मिळेल.


मिथुन राशी (Gemini)


मार्च महिना मिथुन राशीसाठी फलदायी आहे. करिअरच्या अनेक संधी मिळतील. सूर्य देवाच्या कृपेने प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. मार्च महिन्यातील ग्रहांचे राशीपरिवर्तन मिथुन राशीसाठी अतिशय शुभ असणार आहे. परदेशातील नोकरीच्या संधी येतील. तसे अनेक नव्या संधी येतील


तुळ राशी (Libra)


तुळ राशीसाठी मार्च महिना अतिशय शुभ असणार आहे. राशी परिवर्तनमुळे या  राशींना सर्वाधिक फायदा होणार आहे. करिअरच्या संधी मिळतील. प्रगती करण्यासाठी हा चांगला काळ आहे.सूर्य देवाच्या कृपेमुळे मान सन्मान वाढेल. तुळ राशीच्या लोकांना शनी उदयामुळे शुभ फळ मिळणार आहे. सूर्य देव तुम्हाला तुमच्या मेहनीतीचे फळ देईल. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळेल. तुळ राशीसाठी हा महिना अतिशय लाभदायी आहे. तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय उपलब्ध होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हे ही वाचा :