Horoscope Today 16 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 16 नोव्हेंबर 2025, आजचा वार रविवार आहे. आजचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. श्रीखंडोबाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज कोणत्याही कामाचा सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे, महिला विसरभोळ्या बनतील
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे दाखवण्याची वृत्ती राहील, व्यसनांपासून सावधानता बाळगा
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज कोणताही अविचार होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कलाकारांना आपल्या कल्पनाशक्तीला उत्तम वाव देणाऱ्या संधी मिळतील, हट्टीपणा आणि लहरीपणा सोडा.
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज व्यवसाय नोकरीत प्रतिकूल परिस्थितीतही प्रगती करू शकाल
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज कोणाला जामीन राहू नये, घरात आणि घराबाहेर अनपेक्षित संकटांमुळे गोंधळून जाल.
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज पाठीची दुखणी यासारख्या आजारावर वेळीच औषध उपचार करावे लागेल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज जुनी येणी वसूल होतील, महिलांनी लहरीपणा सोडावा.
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज कोणती गोष्ट दुसऱ्याला देताना स्वतःच्या स्वातंत्र्यावर कोठे गदा येत नाही ना, त्याचा मागवा निश्चित घ्याल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज वेगवेगळ्या संधी मिळतील, कलाकारांना आपली कलाकृती दाखवण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज आर्थिक दृष्टीने चांगले लाभ मिळतील, प्रतिष्ठा वाढेल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज महिलांना कामाची उभारी मिळेल, अत्यंत धीटपणे उत्साहाने सतत कार्यरत राहाल.
हेही वाचा
Weekly Lucky Zodiac Signs: नवा आठवडा..पैसा..इच्छापूर्ती..'या' 5 राशींचं नशीब घेऊन आला! बुधादित्य राजयोग राजासारखं जीवन देणार, तुमची रास?
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
