Zodiac Sign Astrology : ज्योतिष शास्त्रात (Astrology) सर्व 12 राशींबाबत सांगण्यात आलं आहे. या सर्व बारा राशींचा (Zodiac Sign) स्वभाव पूर्णपणे वेगळा असतो. प्रत्येक राशीची वेगळी काही वैशिष्ट्य आहेत. काही जण स्वभावाने शांत तर काही चलाख असतात. ज्योतिष शास्त्रानुसार तीन राशीच्या मुलींचा स्वभाव चलाख असतो. या तिन्ही राशींच्या मुली त्यांच्या वागण्या आणि बोलण्याने इतरांच्या मनावर खास छाप पाडतात. या तीन राशींच्या मुली त्यांच्य वक्तव्याने सर्वांना आकर्षिक करतात. या तीन राशींच्या मुली दिसायलाही सुंदर आणि हुशार असतात. त्यांचा बेधडक स्वभाव इतरांना आकर्षित करतो. या तीन राशी कोणत्या आणि त्यांचा स्वभाव कसा आहे ते जाणून घ्या.
वृषभ रास (Taurus)
ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीच्या मुली इतरांचं मन जिंकण्यात पटाईत असतात. यांची वकृत्व शैली काहीशी वेगळी आणि खास असते. या राशीच्या मुली जिथे जातात तिथे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करतात. वृषभ राशीच्या मुलींची बोलण्याची शैली वेगळी असते. यांचं व्यक्तिमत्व इतरांसाठी आकर्षण ठरतं.
मिथुन रास (Gemini)
मिथुन रास असणाऱ्या मुली अत्यंत हुशार आणि सुंदर असतात. या राशीच्या मुलींच्या वाणीवर मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह विराजमान असतो, त्यामुळे मिथुन राशीच्या मुलींची वाणी आकर्षक असते. यांचा बेधडक अंदाज आणि मोकळे विचार व्यक्त करण्याची शैली इतरांना आकर्षित करते. यामुळे मिथुन राशीच्या मुली चर्चेत असतात. बोलण्यामध्ये यांच्यासोबत कुणीही जिंकू शकत नाही. मिथुन राशीच्या मुली मनाने फार साफ असतात. या राशीच्या मुली मनात कोणतीही गोष्ट लपवून ठेवत नाहीत. या राशीच्या मुलींचा स्वभाव हसतमुख असतो. यांच्याकडे लोक आकर्षित होतात.
वृश्चिक रास (Scorpio)
वृश्चिक राशीच्या मुली फारच हुशार आणि तल्लख असतात. या राशीच्या मुली विशेष साहसी आणि चलाख असतात. या राशीच्या मुलींची वक्तृत्व शैली खास असते. त्यांचा सेंस ऑफ ह्यूमरही खूप चांगला असतो. यामुळे अनेक जण त्यांच्याकडे आकर्षित होतात. या राशीच्या मुली कोणत्याही कठीण परिस्थितीला न घाबरता सामोऱ्या जातात. या राशीच्या मुली कोणत्याही संकटाला तोंड देण्यास सक्षम असतात. वृश्चिक राशीच्या मुलींचं व्यक्तिमत्व फारच आकर्षक असतं, यामुळे पहिल्याचं भेटीत या मुली इतरांवर आपलं प्रभुत्व जमवतात. कुठे, कोणत्या परिस्थितीत, काय बोलायचं आणि काय करायचं याची उत्तम समज वृश्चिक राशीच्या मुलींना असते.
महत्त्वाच्या इतर बातम्या