Ekadashi Born Girl : हिंदू कॅलेंडरनुसार एका महिन्यात दोन एकादशी (Ekadashi) येतात. एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात. एकादशी तिथीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. ही तिथी अत्यंत शुभ मानली जाते. ही तिथी भगवान विष्णूशी संबंधित आहे, असे  मानले जाते.   

Continues below advertisement


एकादशी तिथीचे व्रत सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. एकादशी व्रताचे वर्णन महाभारताच्या (Mahabharat) कथेतही आढळते. असे मानले जाते की एकादशी व्रताचे माहात्म्य भगवान श्रीकृष्णानेच (Srikurmam) धर्मराजा युधिष्ठिर आणि अर्जुनाला सांगितले होते. त्यामुळे ही तिथी विशेष मानली जाते. म्हणूनच असे मानले जाते की या तारखेला जन्मलेल्या मुलींमध्ये अशी काही खास गोष्ट असते जी त्यांना इतरांपेक्षा वेगळी बनवते. या तिथीच्या दिवशी जन्मलेल्या मुली या खूप भाग्यवान असतात आणि त्याच्यावर महालक्ष्मीची कृपा असते असे म्हटले जाते. 


एकादशी तिथीला जन्मलेल्या मुलींची वैशिष्ट्ये (Ekadashi Born Girl )


शिक्षण आणि संस्कृतीचे महत्त्व समजते.
त्यांना धार्मिक कार्यात विशेष आवड असते. 
या मुली नियमांचे पालन करतात. 
गंभीर आणि विचारशील असतात. 
आपली जबाबदारी चोख पार पाडतात.
त्या सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या असतात.
एकादशी तिथीला जन्मलेल्या मुलींचे हृदय कोमल असते.
त्यांच्यात लोभ आणि स्वार्थाची भावना नसते.
लक्ष्मीजींचा आशीर्वाद सदैव राहो.
पतीसाठी देखील भाग्यवान असतात, पतीचे सौभाग्य वाढते.
त्यांचा सर्वत्र आदर केला जातो.


एकादशीला काय करावे
असे मानले जाते की, या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने भाग्य वाढते, जीवनातील अडथळे दूर होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. एकादशीच्या दिवशी दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. यासोबतच या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी घातल्याने जीवनात मंगलमयता प्राप्त होते. या दिवशी जन्मलेल्यांनी या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या :


Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ