Gemini Monthly Horoscope July 2023 : मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 मध्ये तुम्हाला पैशांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जुलैमध्ये तुमचा आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थी मोठ्या प्रकल्पात उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. या महिन्यात तुम्ही एखाद्या चांगल्या मालमत्तेत देखील गुंतवणूक करू शकता. तसेच, भागीदारीत व्यवसाय करणे देखील तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत मिथुन राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 


या महिन्यात तुम्हाला धनलाभ देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. इतरांच्या खाजगी आयुष्यात लुडबूड न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. 


ग्रहांचे मिथुन राशी परिवर्तन


7 जुलैपर्यंत तुमच्या राशीत भद्रा योग राहील, त्यामुळे तुम्हाला जुलै महिन्यात व्यवसायात पैशांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सप्तम घरात गुरुच्या नवव्या राशीमुळे नवीन गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे. तुम्ही व्यवसायात पैसे गुंतवू शकता. 17 ते 24 जुलै या कालावधीत द्वितीय घरात बुधादित्य योग तयार झाल्यामुळे तुमच्या व्यवसायात वाढ होण्याची चांगली शक्यता आहे. 25 जुलैपासून अकराव्या घरातून बुधाचा नववा-पंचम राजयोग असेल, त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या चांगला आहे. धनलाभही होईल.


मिथुन राशीचे करिअर कसे असेल?


1 जुलैपासून मंगळाच्या दहाव्या घरातून षडाष्टक दोष असेल आणि अकराव्या घरात चांडाळ दोष तयार झाल्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. या महिन्यात राजकारणापासून दूरच राहणं फायदेशीर ठरेल. 17 ते 24 जुलै दरम्यान सूर्य-बुध द्वितीय घरात बुधादित्य योग असेल. या महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल, कामाच्या ठिकाणी अधिकारीही तुमच्यावर प्रसन्न होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा चांगली राहील.

मिथुन राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील?


6 जुलैपर्यंत सप्तम घरातून शुक्राचा षडाष्टक दोष राहील, त्यामुळे जोडीदाराबरोबरच्या नात्यात गोडवा राहील. या महिन्यात नात्यात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका. नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे.


मिथुन राशीचे करिअर कसे असेल? 


पाचव्या घरात बृहस्पतिच्या सप्तमीमुळे विद्यार्थी कोणत्याही मोठ्या प्रकल्पात चांगली कामगिरी करू शकतील. पण, केतुच्या पाचव्या घरामुळे तुमचे मन विचलित होईल. 16 जुलैपर्यंत सूर्याच्या पंचम घरातून नवम-पंचम राजयोग आहे. या काळात विद्यार्थी आपल्या कौशल्याचा योग्य वापर करतील.  


मिथुन राशीच्या लोकांची आरोग्य स्थित


1 जुलैपासून सहाव्या घरात मंगळाच्या चौथ्या राशीमुळे महिनाभर तुमची संपूर्ण एकाग्रता राहील. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही फिट असाल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या