LPG Cylinder Price on 1st July 2023: आज जुलै महिन्याचा पहिला दिवस. आज 1 जुलैपासून एलपीजी सिलेंडरचे (LPG Cylinder) नवे दर जारी करण्यात आले आहेत. इंडियन ऑईलच्या (Indian Oil) वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, 14.2 किलो एलपीजी सिलेंडर (LPG Gas) आणि 19 किलो कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत (Commercial Cylinder Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिरच आहेत. 


देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये (News Delhi) स्वयंपाकघरातील वापरासाठी एलपीजी सिलेंडरची किंमत 1103 रुपये आणि व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1773 रुपये आहे. याशिवाय देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत (Mumai News) एलपीजी सिलेंडरची किंमत 1102.50 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1725 रुपयांवर कायम आहे. कोलकातामध्ये (Kolkata) एलपीजी सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे. तर व्यावसायिक वापराच्या सिलेंडरची किंमत 1875.50 रुपये आहे. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, चेन्नईमध्ये एक एलपीजी सिलेंडर 1118.50 रुपयांवर आहे, तर व्यावसायिक सिलेंडर 1937 रुपयांना विकला जात आहे. 


व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कधी वाढल्या होत्या?


सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बऱ्याचदा बदल केले आहेत. गेल्या महिन्यात जूनमध्ये व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किमतींत 83 रुपयांनी कपात करण्यात आली होती. तसेच, मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींत घट झाली आणि एका सिलेंडरची किंमत 1856.50 रुपयांवर पोहोचली. एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2028 रुपये होती. मार्चमध्ये त्याची किंमत सर्वाधिक 2119.50 रुपये होती. जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1769 रुपये होती.


जूनपासूनच घरगुती सिलेंडरच्या किमती स्थिर 


गेल्या काही महिन्यांपासून एलपीजीच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही. मार्चमध्ये एलपीजी सिलिंडरमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. तसेच, त्याआधी गेल्या वर्षी 6 जुलै रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला होता. देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत मार्चपर्यंत 1053 रुपये होती, त्यात 50 रुपयांनी वाढ झाली होती आणि आता घरगुती सिलेंडर 1103 रुपये प्रति सिलेंडर विकला जात आहे.


पेट्रोल-डिझेलच्या किमतींत बदल झाले?


आज 1 जुलै, महिन्याचा पहिला दिवस. आजच्या दिवशी देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol and Diesel Price) जाहीर केले आहेत. आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींत काहीच बदल करण्यात आलेला नाही. आजही देशातील महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती जैसे थेच आहेत. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्यांकडून निश्चित केले जातात. गेल्या वर्षभराहून अधिक काळ देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Rule Change From July 2023: आजपासून देशात 'हे' 5 महत्त्वाचे बदल... HDFC मर्जर, LPG दर आणि RBI Floating Bond पर्यंत अनेक गोष्टी बदलल्या