Gemini Horoscope Today 29th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत बदलीची (Job Transfer) संधी मिळू शकते. आज तुमच्या व्यवसायात वाढ होईल. वडिलोपार्जित व्यवसायात तुम्ही काही बदल कराल, ज्यामुळे तुम्हाला व्यवसाय (Business) पुढे नेता येईल. या व्यवसायात मेहनत जास्त असेल, पण यश मिळेल. राजकारणात यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तब्येतीची काळजी घ्या. दीर्घकाळ असलेला आजार आज तुम्हाला पुन्हा त्रास देऊ शकतो. त्यामुळे तुम्ही वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. विद्यार्थी (Students) एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी जाऊ शकतात. जे घरातून ऑनलाईन काम करतात, त्यांना चांगला फायदा होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ सदस्यांच्या चरणस्पर्श करुन आशीर्वाद घ्या.
कौटुंबिक जीवनात उत्साह
आज मिथुन राशीचे (Gemini Horoscope) लोक व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करु शकतात. आजचा दिवस तुमच्यासाठी काम आणि कौटुंबिक जीवनात उत्साहाने भरलेला असणार आहे. सध्या परीक्षेचा काळ सुरु आहे त्यामुळे विद्यार्थी अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करतील, त्याचा त्यांना फायदा होईल. वैवाहिक नात्यात गोडवा येईल आणि परस्पर संबंधात जवळीक वाढेल. आज एकत्र कुठेतरी जाण्याचा बेत बनू शकतो. नवीन वाहनाचा आनंदही मिळू शकतो. बऱ्याच काळापासून सुरु असलेले कायदेशीर काम संपेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडल्यास आर्थिक लाभ होईल.
आजचे मिथुन राशीचे आरोग्य
मानदुखीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तसेच, तुम्हाला या समस्येला सामोरं जावं लागू शकते. यासाठी मानेशी संबधित व्यायाम करताना काळजी घ्या तसेच, शरीराला काही काळ विश्रांती देखील द्या.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय
हनुमानाची पूजा करा आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावून सुंदरकांड पठण करा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :