Gemini Horoscope Today 16th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. अतिरिक्त उत्पन्नासाठी तुमच्या सर्जनशील कल्पनांचा वापर करा. तसेच, आज तुम्हाला स्वत:साठी वेळ मिळेल. या वेळेचा सदुपयोग करा. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध होतील. परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत करताना दिसतील.
सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल
आज मिथुन राशीच्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात विशेष लक्ष द्यावं. परदेशात काम करण्याची संधी मिळू शकते. आज पैशाचे व्यवहार करणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकतं. कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडिलांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल. नातेवाईकांसोबतचे नातेसंबंध चांगले राहतील. सामाजिक कार्य करण्याची संधीही मिळेल. आज काही खास लोकांची भेट होऊ शकते. आज नशीब 71 टक्के तुमच्या बाजूने असेल.
तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी तुमच्या सकारात्मक विचारांचा आधार घ्या. मुलांमुळे तुम्हाला अभिमान वाटेल. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन त्यात विजय मिळवू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदात जाईल. मानसिक आरोग्य जपा. आरोग्याची काळजी घ्या.
आज मिथुन राशीचे आरोग्य :
मिथुन राशीच्या लोकांना मूळव्याधी संबंधी समस्या असू शकतात. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय :
रोग आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी सत्यनारायणाची कथा ऐकून गुरुवारी उपवास करा आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा तसेच मीठ नसलेले अन्न खा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 2 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :