Gemini Horoscope Today 10th March 2023 : मिथुन राशीच्या (Gemini Horoscope) लोकांसाठी आज नशीब तुमच्याबरोबर असेल. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीत बढतीची संधी मिळेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीतही जागा बदलण्याची शक्यता आहे. तुमच्या नशिबाच्या जोरावर तुम्हाला मोठी संधीही मिळू शकते.
धार्मिक स्थळांना भेट द्या
तुमची अनेक दिवसांपासून थांबलेली कामं आज कोणाच्या तरी मदतीने पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संधी देखील निर्माण होतील. यामुळे तुम्हाला नफा मिळून तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. जे कामानिमित्त घरच्यांपासून दुर राहत आहेत त्यांना आज कुटुंबियांची आठवण येऊ शकते. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणी सहभागी व्हा किंवा तुमच्या कुटुंबियांबरोबर थोडा वेळ घालवा. तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घ्या, त्यानंतरच घराबाहेर पडा. तुमची सर्व कामे पूर्ण होतील.
आज नोकरदार वर्गाच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात मानाचं स्थान मिळेल. एकंदरीतच घरगुती वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल.
आजचे मिथुन राशीचे आरोग्य :
खांदे दुखण्याच्या समस्येमुळे काही कामे थांबतील. यासाठी कोणतंही जड सामान किंवा वस्तू फचलू नका. अति उत्साहात काम करणं टाळा.
मिथुन राशीसाठी आजचे उपाय :
आज गायीला गूळ, हरभरा डाळ आणि मैदा खाऊ घाला. नारायण कवच पठण करा.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मिथुन राशीसाठी आजचा लकी नंबर 9 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या :