Garud Puran: हिंदू धर्मात विवाह एक संस्कार मानला जाते. हिंदू धर्मात विवाहाशी संबंधित काही नियम सांगितले आहेत. जे मोडल्यास त्याची महापापाच्या श्रेणीत गणना केली जाते. गरुड पुराणाला हिंदू धर्मात एक महान ग्रंथ म्हटले जाते. ज्यात भगवान श्री विष्णूने पक्षी राजा गरुडाला मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या ग्रंथात चांगल्या आणि वाईट कर्मांचे परिणाम आणि त्यानुसार शिक्षा सांगितल्या आहेत. पत्नी असतानाही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होणे काही पुरूषांसाठी जड जाते, परंतु काही पुरुषांच्या मनात नेहमी हा प्रश्न असतो की जर आपण परस्त्रीशी संबंध ठेवले तर काय होईल? किंवा पत्नीही जेव्हा पतीशिवाय परपुरूषासोबत संबंध ठेवत असेल तर याचे काय परिणाम भोगावे लागतील? हिंदू धर्मात गरुड पुराणात यावर आधारित काही शिक्षा सांगण्यात आल्या आहेत. जाणून घ्या..


बायकोची फसवणूक करुन परस्त्रीशी संबंध ठेवत असाल तर..


गरुडपुराणानुसार, जो व्यक्ती बायकोची फसवणूक करुन परस्त्रीशी संबंध ठेवतो किंवा जी स्त्री नवऱ्याची फसवणूक करुन दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवते, अशा व्यक्तींना मृत्यूनंतर नरकवास लाभतो आणि त्याचा फार छळ केला जातो. एकाच वेळी अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणं देखील पाप आहे. आणि गरुड पुराणात अशा अनेक पापांसाठी विविध शिक्षांबदद्ल सांगण्यात आलं आहे. गरुड पुराणात कोणत्या पापांसाठी कोणती शिक्षा? जाणून घ्या


पत्नीशी गैरवर्तन करणाऱ्याला कोणती शिक्षा?


गरुडपुराणानुसार, जो व्यक्ती आपल्या पत्नीशी गैरवर्तन करतो तो पुढील जन्मात पक्षी बनतो. गरुड पुराण हे मृत्यूनंतरचे नवीन जीवन या संकल्पनेवर आधारित आहे. यामध्ये कर्मानुसार परिणाम स्पष्ट केले आहेत.


तामिस्र नरक - जो व्यक्ती दुसऱ्याची बायको-मुलं चोरतो, दुसऱ्याची धन-संपत्ती चोरतो आणि दुष्कर्म करतो, तो हा नरक भोगतो. चोरीशी संबंधित या नरकात भयंकर अंधार आहे. या नरकात पापी जीवाला बेशुद्ध होईपर्यंत लाठीने मारुन त्याचा छळ केला जातो. आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा पुन्हा त्याचा यमदूतांकडून छळ केला जातो. हा क्रम कित्येक शे वर्षे चालू राहतो.


अंधतामिस्र नरक - जो व्यक्ती आपल्या पत्नीला फसवतो आणि दुसऱ्या स्त्रीशी लैंगिक संबंध ठेवतो तो या नरकात जातो. तसेच जी स्त्री आपल्या नवऱ्याच्या मागे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध ठेवते, ती देखील या नरकात जाते. येथे पापी व्यक्तीला रोज अनेक प्रकारच्या वेदना रोज दिल्या जातात, त्याच्या शरीराचे ठिकठिकाणी तुकडे केले जातात. अंधतामिस्रात पोहोचण्याआधीच, पापी जीव विविध प्रकारच्या दुःखांना बळी पडतो. दुसऱ्याच्या बायकोसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्याचा नरकात वाईट छळ होतो. विद्वान ऋषी या नरकाला अंधतामिस्र, अंधकारमय नरक असं म्हणतात .


तप्तसूर्मि नरक - जर एखादी व्यक्ती वासनेने भरलेली असेल आणि अनेक स्त्रियांशी संबंध ठेवत असेल तर यमदूत त्याला तप्तसूर्मि नावाच्या नरकात पाठवतो. या नरकात तो पापी जीव तळपत्या लोखंडी जाड सळईभोवती गुंडाळला जातो. ज्यांचे पती किंवा पत्नीव्यतिरिक्त इतर कोणाशी शारीरिक संबंध आहेत, त्यांच्या अंगावर जळत राहणारा लोखंड टाकला जातो आणि त्याला चाबकाने मारहाण केली जाते.


गरुड पुराणात स्त्री-पुरुष संबंधांबद्दल सांगितलंय..


ज्योतिषाने सांगितले की, गरुड पुराणात स्त्री-पुरुष संबंधांवर बरेच काही लिहिले आहे. बायकोशी गैरवर्तन करणारी व्यक्ती पुढच्या जन्मात काय होईल? गरुड पुराणात म्हटले आहे की, जो पती स्वार्थापोटी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव पत्नीवर खोटे आरोप करून त्याग करतो, तो पुढील जन्मात चक्रवाक किंवा चकवा पक्षी बनतो. या पक्ष्याचा आवाज अतिशय कर्कश असल्याचे सांगितले जाते. तो दिवसभर मादी पक्ष्याबरोबर राहतो, परंतु रात्री ते वेगळे होतात.


गरुड पुराण म्हणजे काय?


हिंदू धर्मात पुढील जन्माच्या संकल्पनेवर आधारित गरुड पुराणात खूप महत्त्व दिले गेले आहे. पौराणिक मान्यतेनुसार गरुड पुराण हे पक्षी राजा गरुड यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भगवान नारायणाने दिलेल्या शिकवणुकीवर रचले गेले आहे. माणसाने या जन्मात केलेल्या कर्माच्या आधारावर पुढील जन्म कोणाचा घेणार? गरुड पुराणात याचे तपशीलवार वर्णन केले आहे. घरातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास गरुड पाठ केला जातो. या


कालिदासांच्या विरह रचनामध्ये चकवा चकवीचे वर्णन


चकवा चकवीचे वर्णनही कालिदासांनी आपल्या विरह रचनेत केले आहे. चकवा आपल्या जुन्या कर्तृत्वामुळे आपल्या चकवीपासून दूर गेल्याचे दुःख कसे सोसते ते सांगते. त्याच वेळी तो रडतो आणि विलाप करतो. तसेच आयुष्यभर दु:ख भोगल्यानंतर तो आपला जीव सोडतो.


हेही वाचा>>>


Garud Puran: 'महिलांवर वाईट नजर टाकाल तर याद राखा...तुमचाही हिशोब होतोय!' गरुडपुराणात महिलांवरील विविध अत्याचारासाठी 'या' भयानक शिक्षा


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )