Ganesh Visarjan 2025 : महाराष्ट्रात सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची (Ganeshotsav) धामधूम सुरु आहे. लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. अशातच दीड दिवसांच्या गणपतीचं उद्या म्हणजेच 28 ऑगस्ट 2025 रोजी विसर्जन होणार आहे. अशा वेळी गणपती विसर्जनाच्या (Ganesh Visarjan) दरम्यान काही गोष्टी शास्त्रानुसार पाळल्या जातात. अशीच एक पद्धत म्हणजे घरातील भिंतीवर हळद कुंकू लावणे. यामागची धार्मिक मान्यता नेमकी काय आहे ते जाणून घेऊयात. 

शास्त्रात म्हटलंय...

जेव्हा भाद्रपद महिन्यात आपण घरी गणपती आणतो. तेव्हा त्याची विधीवत पूजा करतो. प्राणप्रतिष्ठा करतो. तसेच गणपतीला प्रसन्न करण्यासाठी विविध नैवेद्य दाखवले जातात. भक्तांचा सेवाभाव होऊन बाप्पा त्यांना इच्छित फळही देतात. मात्र, गणपती विसर्जनाच्या आधी घरात हळद कुंकू लावणं गरजेचं आहे. 

गणपती विसर्जनाआधी 'हे' काम करा

लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन झाल्यानंतर मात्र, गणपतीचं विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी. गणपतीचं विसर्जन करण्यााधी घरातून गणपती बाहेर काढताना ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या मागच्या भिंतीला हळद आणि कुंकू लावावे. एका बाजूला हळद तर दुसऱ्या बाजूला कुंकू लावावे. याचं कारण म्हणजे गणपती जेव्हा आल्या घरी येतात तेव्हा रिद्धी सिद्धीसह येतात. आणि जेव्हा गणपती आपल्या गावी जातात म्हणजेच विसर्जन होतं तेव्हा जर आपण घरात हळद कुंकू लावलं नाही तर याचा अर्थ गणपती रिद्धी सिद्धीसह निघून जातात. पतीसह पत्नी जाते. सोप्या भाषेत सांगायचं तर, पती जेव्हा कामानिमित्त बाहेर जातात तेव्हा सुनेने घरी थांबावं अशी यामागची मान्यता आहे. मात्र, कालांतराने काळ जसा बदल तशा परंपराही काळाच्या पडद्याआड होत चालल्या आहे. मात्र, अजूनही काही भागात ही परंपरा पाळली जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                           

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या स्थापनेचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; वाचा पूजा, विधी आणि महत्त्व, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती