Ganesh Visarjan 2025 : हिंदू शास्त्रानुसार, आज अनंत चुतर्दशीचा (Ganesh Visarjan 2025) दिवस आहे. गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav) सांगता आजच्या दिवसाने होणार आहे. लाडके बाप्पा आज आपल्याला निरोप देणार आहेत. त्यामुळे प्रत्येक गणेशभक्ताचा ऊर भरून आला आहे. दहा दिवस गणपतीची पूजा-अर्चा करुन आज बाप्पा आपल्या भक्तांना निरोप देणार आहेत. या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

बाप्पाचं विसर्जन करताना खरंतर कामाची इतकी धावपळ असते की आपल्या नकळत आपल्या हातून चुका घडू शकतात. यामुळे दहा दिवस गणरायाची मनोभावे केलेली सेवा व्यर्थ जाऊ शकते. यामुळेच गणपती विसर्जनाच्या दिवशी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. 

गणपती विसर्जनाच्या दिवशी 'या' गोष्टींची काळजी घ्या 

  • विसर्जनाआधी घरी किंवा मंडळात गणपतीची पूजा करा. त्याचबरोबर, गणपतीला फळ, फूल, मोदक अर्पण करा. 
  • गणरायाला निरोप देताना आपल्या चुकांची क्षमा मागा. तसेच, चांगली कामासाठी बाप्पााकडून प्रोत्साहन मागा. त्यानंतर विसर्जन करा. 
  • गणपतीचं विसर्जन करताना संपूर्ण घरात एकदा गणपतीबरोबर प्रदक्षिणा घाला आणि गणपतीचे आशीर्वाद घ्या. 
  • घरातून बाहेर पडताना गणपतीचं मुख घराच्या दिशेने ठेवा आणि पाठ बाहेरच्या दिशेने असू द्या. याच पद्धतीने गणपतीला विसर्जनाच्या ठिकाणी न्या. 
  • विसर्जित करण्यात येणाऱ्या मूर्तीला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घ्या. तडा गेलेल्या मूर्तीचं विसर्जन अशुभ मानलं जातं. 
  • गणपतीचं घाईगडबडीत विसर्जन करु नका. विसर्जनाच्या आधी शेवटची आरती करा आणि गणरायाकडे क्षमा मागा. 
  • विसर्जन करताना मूर्तीला एकत्र पाण्यात घालू नका. हळुहळू मूर्ती पाण्यात सोडा. 
  • विसर्जनाच्या वेळी उरलेल्या वस्तू इथे तिथे फेकू नका. या वस्तूंना मातीत पुरवा किंवा झाडाखाली ठेवा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                                                       

Ganesh Chaturthi 2026 : पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार? किती दिवस राहिले? पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांची माहिती