Ganesh Chaturthi 2026 Date : गेले 10 दिवस अगदी धूमधडाक्यात आणि जल्लोषात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) आजचा शेवटचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशीचा दिवस आहे. 'गणपती बाप्पा मोरया...पुढच्या वर्षी लवकर या' या जयघोषात आपण सर्व बाप्पांना निरोप देणार आहोत. 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरपर्यंत सुरु असलेला हा गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) बाप्पाच्या गजरात अगदी न्हाऊन निघाला होता. मात्र, या सगळ्यात बाप्पाला निरोप देताना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याची उत्सुकता सर्वांमध्ये पाहायला मिळतेय. त्यानुसार, 2026 मध्ये लाडक्या बाप्पांचं आगमन कधी होणार आहे या संदर्भात पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांच्याकडून जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार? (When is Ganesh Chaturthi In 2026)

हिंदू कॅलेंडरप्रमाणे, 2026 मध्ये सप्टेंबरच्या महिन्यात गणेश चतुर्थी आहे. म्हणजेच, 14 सप्टेंबर 2026 रोजी बाप्पांचं आगमन होईल. पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन 18 दिवस उशिरा म्हणजेच 14 सप्टेंबरला होणार आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार आहे. तसेच, सहाव्या दिवशी गौरी विसर्जन होणार आहे. असे पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांनी सांगितले. 

गणेश चतुर्थीचं महत्त्व (Importance Of Ganesh Chaturthi 2026)

पौराणिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला भगवान शंकर आणि देवी पार्वती यांचा पुत्र म्हणजेच गणेशाचा जन्म झाला. त्यामुळेच या दिवसाला गणेश चतुर्थी म्हणतात. भगवान गणेश हे बुद्धी, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. म्हणून या दिवशी गणरायाची पूजा केली जाते. गणेशोत्सवाच्या दिवशी गणरायाची विधीवत पूजा केल्याने संकटांपासून मुक्ती मिळते. घरात सुख-समृद्धीचं आगमन होतं. बाप्पा लाडक्या भक्तांना आशीर्वाद देतात. तसेच, श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, शांति आणि समृद्धी नांदते, घराची भरभराट होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.

Continues below advertisement

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                                                                

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे काही तास शिल्लक; 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन, वाचा योग्य पूजा पद्धत आणि विधी