Ganesh Chaturthi 2025 Wishes : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला (Ganesh Chaturthi) गणेश चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी ढोलताशांच्या गजरात गणपतीचं वाजत गाजत स्वागत केलं जातं. त्यानुसार, येत्या 27 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच उद्या गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. सण म्हटला की, मित्र-परिवाराला, नातेवाईकांना शुभेच्छा देणं आलंच. सध्या लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देतात. याच निमित्ताने तुम्हाला सुद्धा जर तुमच्या मित्र-मैत्रीणींना शुभेच्छा द्यायच्या असतील तर हे शुभेच्छा संदेश तुम्ही नक्की पाठवू शकता. 

गणेश चतुर्थी शुभेच्छा संदेश 2025 (Ganesh Chaturthi 2025 Wishes)

वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ:निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदागणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरयागणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

 

मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवलामखर नटून तयार झालेवाजत गाजत बाप्पा आलेसर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा...!

सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुतेगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

हार फुलांचा घेऊनी वाहू चला हो गणपतीला,आद्य दैवत साऱ्या जगाचे, पूजन करुया गणरायाचेगणपती बाप्पा मोरया!

मोरया मोरया मी बाळ तान्हेतुझीचे सेवा करु काय जाणेअन्याय माझे कोट्यानुकोटीमोरेश्वरा बा तू घाल पोटीगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..!

स्वर्गातही मिळणार नाही ते सुख तुझ्या चरणाशी आहे...संकट असू दे कितीही मोठेतुझ्या नावात सर्वांचे समाधान आहे...गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोततुमचे सर्व दु:ख संकटे दूर होवोतश्री गणपती बाप्पा तुमच्या घरी येवोगणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा...!

मोदकांचा प्रसाद ,लाल फुलांचा हार ,नटून - थटून बाप्पा तयार,वाजत गाजत बाप्पा घरात,सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

वंदन करतो गणरायाला,हात जोडतो वरद विनायकाला,प्रार्थना करतो गजाननाला,सुखी ठेव सर्वांना...गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुदि्ध प्रचोदयात।।गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                                                                                       

Ganesh Chaturthi 2025 : गणपतीच्या स्थापनेचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका; वाचा पूजा, विधी आणि महत्त्व, पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती