Ganesh Chaturthi 2025: सध्या गणेशोत्सव निमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. आपल्या हिंदू धर्मात अशी श्रद्धा आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी भगवान श्री गणेशाची पूजा केली पाहिजे. बुधवारी भगवान श्री गणेशाची पूजा विधिवत केली जाते. भगवान श्री गणेश आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि त्यांचे सर्व दुःख दूर करतात आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. भगवान श्री गणेश स्वतः रिद्धी सिद्धीचे दाता आणि शुभ लाभ देणारे आहेत. मात्र सध्या आपण पाहतो, आजकाल इंटरनेटवरून मंत्रोच्चार करून पूजा विधी किंवा आरती केली जाते. मात्र ही अशा पद्धतीने केलेली पूजा कितपत सफल होते? तसेच त्याचे पुण्य मिळते का? याबाबत डॉ भूषण ज्योतिर्विद यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
पूजा, आरती ही फक्त मंत्रोच्चार किंवा गाणं नसून ती भावना..
डॉ भूषण ज्योतिर्विद सांगतात, पूजा–आरती ही फक्त मंत्रोच्चार किंवा गाणं नसून ती भावना (भक्तिभाव) आणि संपर्क (देवाशी जोडलेली प्रार्थना) आहे. म्हणून Alexa, Siri किंवा YouTube वरून आरती वाजवली तरी ती फक्त आवाज (recorded sound) असतो, आपल्या भावनेचा उच्चार नसतो. आपला मानसिक सहभाग नसतो आपण केवळ एकात असतो एक मर्यादित पुण्य किवा सहभाग त्याला म्हणू शकतो पण संपूर्ण नाही
प्रत्यक्ष पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही?
मानवी उच्चार आणि श्वासाची शक्ती – जेव्हा आपण स्वतः मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या श्वासातून कंपन (vibrations) निर्माण होतात. हे कंपन घरातील वातावरण, पाणी, धूप, दिवा यावर परिणाम करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. मशीनमधून आलेला आवाज असा स्पंदनशक्ती निर्माण करत नाही.
भक्तिभाव महत्त्वाचा – पूजा/आरती केल्यावर देव कृपा देतात कारण त्यात आपली निष्ठा आणि श्रद्धा असते. Alexa/YouTube वर गाणं वाजलं तरी आपण भावपूर्वक बसून ऐकलं तर मन शुद्ध होतं, पण प्रत्यक्ष पूजेचे संपूर्ण फळ मिळत नाही.
परंपरेनुसार श्रुतीशक्ती – वेद-मंत्रांचे उच्चारण जिवंत वाणीने झाले की त्याला श्रुतीशक्ती मिळते. Recorded आवाजाला तो प्रभाव नसतो.
साधा नियम
स्वतः उच्चारलेले मंत्र/आरती → जास्त फळरेकॉर्डेड (YouTube, Alexa, Siri) → केवळ श्रवणाचे पुण्य
म्हणजेच, जर वेळ/आरोग्य/ज्ञानामुळे आपण स्वतः आरती म्हणू शकत नसू, तर रेकॉर्डिंग वाजवून भावपूर्वक मनाने सहभागी होणं हेही चांगलं आहे. पण त्याची फळे मर्यादित मिळतात.
डॉ भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचं भाग्य घेऊन आलेत, पॉवरफुल धनयोग बनतोय! नोकरीत पगारवाढ, उत्पन्न वाढेल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)