Ganesh Chaturthi 2024 Wishes : महाराष्ट्रासह, देशभरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. घरोघरी लाडक्या बाप्पाचं आगमन व्हायला अवघे काही तास उरले आहेत. याच निमित्ताने गणरायाचा उत्साह आणि आनंद द्विगुणित करण्यासाठी तुम्ही काही खास शुभेच्छा संदेश आपल्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, तसेच मित्र मंडळींना पाठवू शकता.
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव साजरा केला जातो. यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी गणपतीची स्थापना करुन विधीवत पूजा केली जाते. असं म्हणतात यामुळे सौभाग्यात चांगली वृद्धी होते.
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास, घरात आहे लंबोदराचा निवास,दहा दिवस आहे आनंदाची आरास गणपती बाप्पा मोरया...
तुमची गणेश चतुर्थी आशीर्वादाने,
स्वादिष्ट मोदकांनी आणि
आनंदाच्या क्षणांनी भरलेली जावो.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा...!
सर्व मांगल्य मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणी नमोस्तुते
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!!
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीचा सण तुमच्या हृदयात आणि घरात प्रेम, शांती आणि आनंद घेऊन येवो... गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वर्गातही मिळणार नाही ते सुख तुझ्या चरणाशी आहे...संकट असू दे कितीही मोठेतुझ्या नावात सर्वांचे समाधान आहे...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
वंदन करतो गणरायाला हात जोडतो वरद विनायकाला प्रार्थना करतो गजाननाला,सुखी ठेव नेहमी, सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
श्रावण सरलाभाद्रपद चतुर्थीची पहाट आली, सज्ज व्हा फुले उधळायला गणाधिशाची स्वारी आली गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
कुणी म्हणे तुज 'गणपती'विद्येचा तू अधिपती...कुणी म्हणे तुज 'वक्रतुंड'शक्तिमान तुझे सोंड...गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
मोदकांचा प्रसाद केला लाल फुलांचा हार सजवला मखर नटून तयार झाले,वाजत गाजत बाप्पा आलेसर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :