Ganesh Chaturthi 2024 : लाडक्या बाप्पाचं (Lord Ganesh) आगमन होण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. 7 सप्टेंबर रोजी देशभरात गणेश चतुर्थीचा (Ganesh Chaturthi) उत्सव साजरा केला जाणार आहे. यावर्षी भाद्रपद शुक्ल गणेश चतुर्थी फार खास असणार आहे. कारण यंदा तब्बल 100 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, ब्रह्म योग आणि इंद्र योग अशा शुभ योगांचा संयोग जुळून येणार आहे. त्याचबरोबर या दिवशी स्वाती आणि चित्रा नक्षत्र योग देखील जुळून येणार आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


या निमित्ताने गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश स्थापना आणि पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे. त्याचबरोबर, ग्रह नक्षत्रांच्या या स्थितीचा 3 राशींवर फार शुभ परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना सुख-समृद्धी प्राप्त होईल. त्याचबरोबर आयुष्यात चांगले दिवस येतील. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


गणेश चतुर्थीचा काळ वृषभ राशीच्या लोकांसाठी फार शुभदायक असणार आहे. या काळात तुमची सर्व कामे मार्गी लागतील. तसे, नवीन कार्य सुरु करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमच्या धन-संपत्तीत चांगली वाढ होईल. 


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार उत्साहवर्धक असणार आहे. या काळात तुम्हाला अपार धनप्राप्ती होईल. तुमचं कामकाज सुरळीत सुरु राहील. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. 


कन्या रास (Virgo Horoscope)


गणेश चतुर्थीचा काळ कन्या राशीच्या लोकांसाठी फार शुभ असणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तसेच, तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Hartalika Teej 2024 : हरितालिकेच्या दिवशी 'या' 5 गोष्टींचे करा दान; महादेव-माता पार्वतीची सदैव राहील कृपा