Ganesh Chaturthi 2024 : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2024) धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या काळात बाप्पाची पूजा करण्यासोबतच त्याला नैवेद्य देखील दाखवला जातो.  कोणत्याही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो. गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्त्वाचं आहे. 


गणपती बाप्पाला मोदक खूप प्रिय आहे हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण या व्यतिरिक्तही अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या बाप्पाला खूप आवडतात. मोदकासोबत तुम्ही हे पदार्थही गणपतीला अर्पण करू शकता, यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.


मोतीचूर लाडू :


गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात. असं मानलं जातं की, मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पााच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते.


खीर :


तुम्ही गणपतीला खीरही अर्पण करू शकता. असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यांपासून आराम मिळेल आणि तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.


मोदक :


गणपतीला मोदक आवडतात हे सर्वांनाच माहित आहे. एकदा युद्धात गणेशजींचा दात तुटल्यामुळे त्यांना काहीही खाणं शक्य नव्हतं. त्यानंतर आई पार्वतीने त्याच्यासाठी मोदक बनवले. तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत. असं म्हटलं जातं की, बाप्पाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.


केळीचा नैवेद्य :


कोणत्याही पूजेत सर्व देवी-देवतांना केळी अर्पण केली जातात. गणपतीला केळी खूप आवडतात. केळी अर्पण केल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते.


नारळ :


गणपतीला नारळही अर्पण केला जातो. नारळाच्या माडाला कल्पवृक्ष असंही म्हणतात. ब्रह्मा, विष्णू आणि महेश कल्पवृक्षात राहतात, असं मानलं जातं. त्यामुळे या झाडाचं फळ म्हणजेच नारळ, हे सर्व देवांना अतिशय प्रिय आहे. नारळ गणेशाला अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो.


गणपतीला नैवेद्य दाखवताना या मंत्राचा जप करा


बाप्पाला नैवेद्य दाखवताना मंत्राचा जप केल्याने बाप्पा नैवेद्य लवकर स्वीकारतात.


त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये। गृहाण सम्मुखो भूत्वा प्रसीद परमेश्वर ।।


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले