Ganesh Chaturthi 2023 Astrology : हिंदू दिनदर्शिकेनुसार, आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2023) आहे. यावर्षी असे अनेक योगायोग आणि शुभ योग घडत आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थी आज विशेष ठरणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार 300 वर्षांनंतर गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत.
गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग
ज्योतिषांच्या मते गणेश चतुर्थीला एकत्र तीन शुभ योग तयार होणार आहेत, त्यामुळे गणेश चतुर्थीचा सण खूप खास असणार आहे. या दिवशी ब्रह्म योग, शुक्ल योग आणि शुभ योग असतील. पंचांगानुसार यंदा गणेश चतुर्थीला विशेष योग तयार होणार आहे. त्यामुळे यंदाची गणेश चतुर्थी आणखी खास झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ही गणेश चतुर्थी काही राशींसाठी खूप खास आहे. जाणून घ्या कोणत्या 4 राशीं आज भाग्यवान असतील?
मेष
गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैयक्तिक जीवनात आनंद राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीसाठी वेळ अतिशय अनुकूल असणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाला सिंदूर अर्पण करा.
मिथुन
तुम्हाला श्रीगणेशाचा विशेष आशीर्वादही प्राप्त होईल. नशीब बदलल्याने आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात दुप्पट वेगाने नफा मिळेल. याशिवाय कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल.
कन्या
बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूप खूश होतील आणि ते तुमची पदोन्नती करू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठे बाहेरही जाऊ शकता.
मकर
मकर राशीच्या लोकांना गणेश चतुर्थीच्या दिवसापासून मान-प्रतिष्ठा मिळेल. या दिवशी मंदिरात जाऊन गणेशाची पूजा करावी. मकर राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे स्रोत वाढतील. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित समस्या दीर्घकाळ दूर होतील.
गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
यंदाची गणेश चतुर्थी 18 सप्टेंबर 2023 दुपारी 2:09 वाजता सुरू होईल आणि 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3:13 पर्यंत चालेल. ज्योतिषांच्या मते, पंचागानुसार, 19 सप्टेंबर हा दिवस गणेश स्थापनेसाठी अतिशय शुभ आहे. 19 सप्टेंबर रोजी गणेश स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:01 ते दुपारी 01:28 पर्यंत आहे. असे मानले जाते की, श्रीगणेशाचा जन्म मध्यान्हकाळात झाला होता, म्हणून दुपारची वेळ गणेशपूजेसाठी अधिक शुभ मानली जाते. मध्य मुहूर्तामध्ये, भक्त पूर्ण विधींनी गणेशपूजा करतात, ज्याला षोडशोपचार गणपती पूजा असेही म्हणतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या बातम्या
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' गोष्टी लक्षात ठेवा, काय करावे, काय करू नये? जाणून घ्या