Gaj Kesari Yog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र दर अडीच दिवसांनी राशी परिवर्तन करत असतो. ज्यावेळी चंद्र राशीपरिवर्तन करतो त्यावेळी कोणत्या तरी राशीत जातो. चंद्राने राशी परिवर्तन केल्यामुळे कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी युती होते. ज्यामुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. होळीच्या दिवशी चंद्र कन्या राशीत केतुसह युती करणार आहे. केतुमुळे चंद्रग्रहण लागणार आहे. तर लगेच दोन दोन दिवसानी चंद्र तुळ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच आता गजकेसरी योग तयार होत आहे. गजकेसरी योगाची निर्मिती अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकते. गजकेसरी योग (Gaj Kesari Yog) तयार  झाल्यामुळे कोणत्या राशींना विशेष लाभ होऊ शकतो ते जाणून घेऊ या.


मकर  (Gemini)


मकर राशीसाठी  दुहेरी गजकेसरी योग फायदेशीर असणार आहे. या राशीच्या लोकांना अचानक धन प्राप्ती होण्याची शक्यता आहे.. पुढील दोन- तीन दिवस खूप महत्त्वाचे असू शकतात. व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. चतुर्थ भावात चंद्राची दृष्टी पडल्याने घरात सुख- शांती नांदेल. नवीन वाहन, मालमत्ता खरेदी करू शकता. यासोबतच घरात काही शुभ कार्य होऊ शकतात. यासोबतच नवीन व्यवसाय, व्यवसाय किंवा नोकरीसाठी ते चांगले राहणार आहे. यासोबतच अचानक आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात लाभ होईल. तुम्हाला लोकांचे सहकार्य मिळेल, त्यामुळे तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात.


तूळ (Libra) 


या राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेसरी योग अतिशय लाभदायक ठरणार आहे. .  या राशीच्या लोकांना अमाप संपत्ती मिळेल आणि त्यांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. भगवान शंकराच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीच्या अनेक नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. राशीत चंद्र असल्यामुळे मानसिक तणावातून आराम मिळेल. एकाग्रता, ज्ञान, बुद्धी आणि विवेक जागृत होईल. लव्ह लाईफ सुद्धा चांगली जाणार आहे. उच्च शिक्षणाशी संबंधित निर्णय घेऊ शकाल. भविष्यात तुम्हाला याचा फायदा होईल. सप्तम भावात चंद्राची दृष्टी पडल्यामुळे लग्नाची शक्यताही निर्माण होत आहे.


वृश्चिक (Scorpio)


या राशीच्या लोकांसाठी दुहेरी गजकेसरी योग फलदायी असणार आहे. या राशीच्या १२व्या घरात चंद्र असेल. अशा परिस्थितीत तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. यासोबतच तुम्ही परदेशात बिझनेस करण्याचा किंवा तिथे राहण्याचा विचारही करू शकता. गुंतवणुकीमुळे फायदाही होऊ शकतो. यामुळे लव्ह लाईफ चांगली होणार आहे. प्रेमविवाह होण्याचीही शक्यता आहे. व्यवसायातही भरपूर फायदा होणार आहे. भागीदारी व्यवसायातही नफा मिळेल. एकाग्रता वाढेल, ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मोठा विचार करून तुम्ही व्यवसाय किंवा करिअरमध्ये चांगला निर्णय घेऊ शकता.


हे ही वाचा :



(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)